पुणे : जेवढी गर्दी मंदिराच्या गाभाऱ्यात आहे, तेवढीच गर्दी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेणाऱ्या लोकांची सुद्धा आहे. त्यामुळे सकाळपासून दगडूशेठ गणपती मंदिराजवळ पोलिसांकडून सुद्धा मोठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून सुद्धा काळजी घेण्यात येत आहे.
नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली : लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि रविवार त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीमुळे नागरिकांनी दर्शनासाठी आज दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गर्दी केली आहे. चैत्र महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी असल्याने आजपासून भाविक वेगवेगळे उपवाससुद्धा करतात. त्यामुळे आजची सकाळची सुरुवात गणपती दर्शन आणि भाविकांनी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्ट्याचा सुद्धा परिणाम म्हणूनही गर्दी दिसत आहे.
भाविकांसाठी इतर व्यवस्था करण्यात आल्या : भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाकडून सुद्धा सांगण्यात आलेले आहे. भाविकांसाठी ऊन लागू नये म्हणून तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविक रांगेत मंदिरांकडून लाल पट्ट्याच्या चादरीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळेस संकट चतुर्थीला मोठी गर्दी होते. परंतु आजची गर्दी ही इतर संकष्ट चतुर्थी पेक्षा खूप प्रमाणात जास्त असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आलेले आहे. मंदिरांकडून सुद्धा सकाळपासूनच कर्मचारी दर्शन रांगेतून नियोजन करत आहेत. लवकरात लवकर भाविकांना दर्शन मिळेल याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.
विधिवत पूजा करण्यात आली : आज सकाळी दगडूशेठ गणपती मंदिर मध्ये विविध फळाची आरास करून, विधिवत पूजा करण्यात आली. दगडूशेठ गणपतीला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. दगडूशेठ गणपतीला वेगवेगळे फळे आणि फुले अर्पण करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून सुद्धा गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विश्वस्त सुनील रासने यांनी दिलेली आहे. भाविकांनी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे.