बारामती - तुम्ही सगळे बारामतीचे आहात, बारामतीमध्ये मी काम करत असताना उद्या कोणी आरोप केला की एखाद्या संस्थेत घोटाळा झाला. तर त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. त्यात जर तथ्य आढळले तर कारवाई करता येते. मात्र तथ्य आढळले नाही, पुरावे सादर केले नाही, तर कारवाई करता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) म्हणाले. मुंबई महानगरपालिकेत कोविड ( Covid scam in Mumbai Municipal Corporation ) घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
कोरोना पुन्हा डोके वर काढत असून ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण पुण्यात सापडले आहेत. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, वेगवेगळ्या घटना राज्यात, देशात, जगात घडत असतात. अशा बातम्या आल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजू पडताळून पाहिले जातात. कधी कधी काही बातम्या अफवा म्हणून पण पसरवल्या जाऊ शकतात. काही बातम्यांमध्ये तथ्य असू शकते, असे असले तरी याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना व आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितली आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर असेल तर तशी माहिती देऊन काय काळजी घ्यावी लागेल. हे ज्ञात केले जाईल. राष्ट्रवादीला नवाब मालिकांचा विसर पडला असल्याचा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भिवंडी येथे बोलले होते. आम्हाला कोणाचाही विसर पडलेला नाही. आम्ही सर्वांची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे ती घेत असतो.
हेही वाचा - Sanjay Raut criticize BJP : संभाजी राजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न फसले - संजय राऊत