पुणे - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यभरातून आज (दि.25 जाने.) हजारो शेतकरी आझाद मैदान येथे एकवटले आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला वाटत होते की राज्यात ठिक-ठिकाणी आंदोलन व्हायला हवी होती. पण, शेतकरी नेत्यांना अस वाटते की मुंबईत आंदोलन केले की केंद्र सरकार दखल घेणार, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीही निर्णय नाही
केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये 12 बैठका झाल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याला स्थगिती दिली आहे. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारने रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अनेक वेगवेगळ्या सूचना येत आहे की यात पवारांनी लक्ष घालावे. कृषी कायद्याला स्थगिती मिळाल्याने केंद्र सरकार काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्हीही काहीही निर्णय घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे, सन्मानाचे, फायद्याचे कायदे सरकारने करावे, अशी आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - बारामतीतील खासगी व शासकीय कार्यालये, दवाखान्यांची फायर फायटिंग यंत्रणा रामभरोसे