ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा

बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे. ‘कोरोना’ बाधित रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. अशा सुचाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. पवार यांनी आज आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘कोरोना’ परिस्थितीचा आढावा

author img

By

Published : May 8, 2021, 6:00 PM IST

Updated : May 8, 2021, 7:03 PM IST

बारामती - बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ‘कोरोना’ बाधित रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. शासनाच्या मदतीपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती

येथील वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती जाणून घेतली. तसेच बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे असेही पवार म्हणाले. तसेच ऑक्सिजन व रेमडीसीवरचे योग्य प्रकारे नियोजन करुन ‘कोरोना’ बाधित रूग्णांना वेळवर उपचार मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे लक्षण दिसल्यास रूग्णाला तात्काळ उपचार मिळावेत अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळावे

कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत आणि शिवभोजन थाळीची सेवा योग्य प्रकारे सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोणीही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्यात यावे. तसेच सर्व रूग्णालयांमध्ये स्वच्छता ठेवावी असे, निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - तर कोरोनाची परिस्थिती गंभीर होईल, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Last Updated : May 8, 2021, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.