ETV Bharat / state

राजकारणाचा युवा कट्टा : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची जुगलबंदी, राजकारणात वयोमर्यादा निर्धारित करण्याची युवकांची मागणी - पुणे

राजकारणात नेत्यांची वयोमर्यादा निश्चित करण्याची गरज राजकारणाचा युवा कट्टा वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अधोरेखित केली आहे.

राजकारणाचा युवा कट्टा : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची जुगलबंदी, राजकारणात वयोमर्यादा निर्धारित करण्याची युवकांची मागणी
author img

By

Published : Apr 14, 2019, 10:18 PM IST

Updated : Apr 14, 2019, 11:26 PM IST

पुणे - तापलेल्या राजकीय वातावरणात विविध पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत राजकारणाच्या युवा कट्ट्यावर आपापली मते ठामपणे मांडली. राजकारणात नेत्यांची वयोमर्यादा निश्चित करण्याची गरज यावेळी कार्यकर्त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली आहे.

राजकारणाचा 'युवा कट्टा' या उपक्रमांतर्गत विविध राजकीय पक्षांचे युवा कार्यकर्ते रविवारी चर्चा करण्यासाठी पुण्यात एकत्र जमले होते. यावेळी विविध राजकीय निवेदक म्हणून काम करणारे अनूप जोशी म्हणाले, राजकारणात किंवा समाजकारणात वयोमर्यादेपेक्षा प्रामाणिकपणा आणि उत्साह अधिक महत्त्वाचा आहे. आपल्यासमोर एपीजे अब्दुल कलामांसारखे उदाहरण आहे. ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इतक्या उत्साहाने आणि सचोटीने काम केले होते. त्यामुळे वयाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीची कार्यक्षमता मोजता येणार नाही.

राजकारणाचा युवा कट्टा : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची जुगलबंदी, राजकारणात वयोमर्यादा निर्धारित करण्याची युवकांची मागणी

भारतीय जनता पक्षाचे सुनील मिश्रा म्हणाले, आमच्या पक्षात आजही तरुणांना मोठी संधी उपलब्ध आहे. राजकारणात वयाच्या मर्यादेपेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजिंक्य पालकर म्हणाले, युवकांचा राजकारणात सहभाग असायलाच हवा. युवकांच्या राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. मात्र, सत्ताधारी पक्षाने मागील ५ वर्षांमध्ये अपेक्षेनुसार काम केले नाही.

मनसेचे सारंग सराफ म्हणाले, राजकारणामध्ये वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. मात्र, त्याचबरोबर अनुभवी नेत्यांचे असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपली भूमिका नीट पार पाडलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत विरोध करत आहे.

काँग्रेसचे विनायक ढेरे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणात ६० वर्षे वयोमर्यादा असावी, अशी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेली भूमिका योग्यच आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच राजकारणातही वयोमर्यादा असायला हवी. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसकडे युवकांचा कल वाढलेला आहे, असेही ढेरे यांनी सांगितले.

Intro:पुणे - तापलेल्या राजकीय वातावरणात विविध पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत राजकारणाच्या युवा कट्ट्यावर आपापली मतं ठामपणे मांडली. त्याप्रमाणेच राजकारणात वयोमर्यादा निश्चित करण्याची गरजही कार्यकर्त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली आहे.

Body:राजकारणाचा युवा कट्टा या उपक्रमाअंतर्गत विविध राजकीय पक्षांचे युवा कार्यकर्ते रविवारी चर्चा करण्यासाठी पुण्यात एकत्र जमले होते.

यावेळी विविध राजकीय निवेदक म्हणून काम करणारे अनुप जोशी म्हणाले की, राजकारणात किंवा समाजकारणात वयोमर्यादा पेक्षा प्रामाणिकपणा आणि उत्साह अधिक महत्त्वाचा आहे. आपल्यासमोर एपीजे अब्दुल कलामांसारखे उदाहरण आहे. ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इतक्या उत्साहाने आणि सचोटीने काम केले होते. त्यामुळे वयाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीची कार्यक्षमता मोजता येणार नाही.

भारतीय जनता पक्षाचे सुनील मिश्रा म्हणाले की, आमच्या पक्षात आजही तरुणांना मोठी संधी उपलब्ध आहे. राजकारणात वयाच्या मर्यादेपेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजिंक्य पालकर म्हणाले की, युवकांचा राजकारणात सहभाग असायलाच हवा. युवकांच्या राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. मात्र, सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षांमध्ये अपेक्षेनुसार काम केलेले नाही.

मनसेचे सारंग सराफ म्हणाले की, राजकारणामध्ये वयोमर्यादा असणे गरजेचे आहे मात्र त्याचबरोबर अनुभवी नेत्यांचे असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपली भूमिका नीट पार पाडलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत विरोध करत आहे.

काँग्रेसचे विनायक ढेरे म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकारणात 60 वर्षे वयोमर्यादा असावी, अशी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेली भूमिका योग्यच आहे. करण प्रत्येक क्षेत्रात वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच राजकारणातही वयोमर्यादा असायला हवी. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसकडे युवकांचा कल वाढलेला आहे, असेही ढेरे यांनी सांगितले.

Byte Sent on Mojo
Anup Joshi, Puneri Katta.
Sunil Mishra, BJP.
Sarang Saraf, MNS.
Ajinkya Palkar, NCP.
Byte Vinayak Dhere, Congress.

Conclusion:
Last Updated : Apr 14, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.