ETV Bharat / state

दौंडमध्ये वीजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू

author img

By

Published : May 18, 2021, 9:19 AM IST

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सनराईज फाईन केमिकल्स या कंपनीत विद्युत करंट लागून एका कामगाराचा मृत्यू झाला.संदीप कुमार चर्मकार वय २४ असे त्याचे नाव आहे.स्क्रू कनव्होअर मशीनचा संदिप कुमार चर्मकार याला करंट लागुन तो मशीनला चिकटला प्रोसेसिंग रूममधील विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर संदीप जमिनीवर कोसळला.त्याला तातडीने दौंड येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतू उपचारापूर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एका कामगराचा मृत्यू
death-of-a-worker-due-to-electric-shock

दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सनराईज फाईन केमिकल्स या कंपनीत वीजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी 'हार्मोनि ऑर्गनिक्स' या कंपनीतही एका कामगाराचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे औद्योगिक वसाहतीतील काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी १४ मे रोजी सनराईज फाईन केमिकल कंपनीत ही घटना घडली. संदीप कुमार चर्मकार (वय २४ सध्या रा . कुरकुंभ ता . दौंड मुळ रा. कोटारा खुर्द.ता.जवा जि . रिवा, मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत नरेंद्र रामगरीब वर्मा (वय २६ सध्या रा. कुरकुंभ, ता.दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नरेंद्र वर्मा हे कंपनीमध्ये रात्रपाळीच्या कामासाठी गेले होते. त्यांच्यासोबत हेल्पर म्हणून काम करण्यासाठी अरविंद वर्मा आणि संदिप कुमार चर्मकार हे दोघे होते. कंपनीतील प्रोसेसिंग रूममध्ये कॉस्टीक केमिकलच्या बॅचचे काम सुरू होते. केमिकल स्क्रू कनव्होअर मशिनद्वारे रीअॅक्टर टाकण्यासाठी अरविंद वर्मा व संदिप कुमार चर्मकार हे स्क्रू केन वेअर मशीन चालू करण्यासाठी रिअॅक्टर जवळ घेण्याची तयारी करीत होते. स्क्रू केनव्होअर ओढत असताना मशीनचा स्टीलचा पाईप टेंम्प्रेचर कंट्रोलचे इलेक्ट्रिक लाईटच्या वायरला धडकून वायर कट झाला. यावेळी इलेक्ट्रिक कंरट स्क्रू कनव्होअर मशीनला आल्याने संदिप कुमार चर्मकार याला विजेचा शॉक लागुन तो मशीनला चिकटला. प्रोसेसिंग रूममधील विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर संदीप जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला कंपनीमधील सोबत काम करणाऱ्या कामगारांनी दुचाकीवरून कुरकुंभ येथील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. पंरतु त्यास दौंड येथील रूग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला दौंड येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.सकाळी सात वाजता डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. असे या घटनास्थळावरून मिळालेल्या माहीती मध्ये म्हंटले आहे.

हेही वाचा- म्यूकर मायकोसिस'वरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, अजित पवारांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.