पुणे - तस्करी करून आणलेल्या सोन्यासह एक जणाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर अटक केली आहे. जुहेर जाहिद पेनकर असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव असून तो दुबईहून स्पाईस जेटच्या विमानातून आला होता. त्याच्याकडून 74 लाख रूपये किमतीचे 2 किलो 196 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - इराकमध्ये गोळीबार; २५ ठार, १३० जखमी
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (7 डिसेंबर) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास दुबईहुन स्पाईस जेटचे विमान पुणे विमानतळावर उतरले. या विमानातून उतरलेल्या जुहेर जाहिद पेनकर या प्रवाशाच्या हालचाली सीमाशुक विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटत होत्या. त्याला चौकशीसाठी बाजूला घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 2 किलो 196 ग्राम सोने आढळले.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली
आरोपीने त्याच्या कमरेला बांधलेल्या एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये आणि अंतर्वस्त्रामध्ये लपवून हे सोने आणले होते. पोलिसांनी हे सर्व सोने जप्त केले असून जुहेर जाहिद पेनकर याला अटक केली आहे.