ETV Bharat / state

दौंड तालुक्यातील उंडवडीत पक्ष्यांसाठी ज्युसबार या संकल्पनेतुन वृक्षारोपण

दौंड तालुक्यात पक्ष्यांना नैसर्गिक अन्न आणि निवारा मिळावा यासाठी एक मित्र एक वृक्ष संस्थेने उपक्रम राबविला आहे. या उपक्रमा अंतर्गत ५०० विविध झाले लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

concept-of-juice-bar-is-being-implemented-for-undivadi-birds-in-daund-taluka
दौंड तालुक्यातील उंडवडीत पक्ष्यांसाठी ज्युसबार या संकल्पनेतुन वृक्षारोपण
author img

By

Published : Dec 24, 2020, 4:54 PM IST

दौंड (पुणे) - पक्ष्यांना नैसर्गिक अन्न व निवारा यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून उंडवडी येथील भोसलेवाडी परिसरामध्ये एक मित्र एक वृक्ष या संस्थेच्या मार्फत पक्ष्यांसाठी ज्युसबार अशी अनोखी संकल्पना राबवण्यात येत आहे . राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही पहिलीच संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून 500 विविध प्रकारचे झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. याची नुकतीच सुरुवात भोसलेवाडीतिला ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आली .

दौंड तालुक्यातील उंडवडीत पक्ष्यांसाठी ज्युसबार या संकल्पनेतुन वृक्षारोपण

विविध उपक्रमांतुन वृक्षारोपण -

दौंड तालुक्यात कार्यरत असलेल्या वृक्षप्रेमी प्रशांत मुथा यांच्या एक मित्र एक वृक्ष या संस्थेमार्फत तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी आईचे झाड, प्रेमाचे झाड, देवाचे झाड, वाढदिवसाचे झाड अशा विविध संकल्पना राबवून तब्बल दहा ते बारा हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात आले आहे.

उंडवडीतील भोसलेवाडीत पक्ष्यांसाठी ज्युसबार अशी संकल्पना -

दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालली असून विदेशी झाडे लावण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे. मात्र, विदेशी झाडांवर पक्षांचा आदिवास होत नसून पक्ष्यांच्या अनेक प्रजाती यामुळे नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे केवळ पक्षांना नैसर्गिक रित्या फळे-फुले मिळावीत, त्यांना घरटी करण्यासाठी उपयुक्त झाड मिळावे यासाठी एक मित्र एक वृक्ष या संस्थेच्या माध्यमातून उंडवडीतील भोसलेवाडीत पक्ष्यांसाठी ज्युसबार अशी संकल्पना राबविण्यात आली आहे. याला नागरिकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. पक्ष्यांसाठी ज्युस बार ही संकल्पना राज्यात प्रथमच राबविण्यात येत असल्याचे मुथा यांनी सांगितले.

56 प्रकारची 500 मोठी झाडे लावली -

या प्रकल्पाअंतर्गत भोसलेवाडी ते सुमारे 56 प्रकारची 500 मोठी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यांना ठिबक सिंचन च्या साह्याने पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, पांगारा, उंबर, काटेसावर, पळस, रिठा, खैर यासारख्या झाडांचा समावेश असणार आहे. याची पहिल्या टप्प्याची सुरुवात म्हणून शंभर झाडांचे नुकतेच वृक्षारोपण येथे करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.