ETV Bharat / state

दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची घरवापसी - लॉकडाऊन इफेक्ट

दिल्ली येथे युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आज पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले. सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले.

competitive exam student returned  स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची घरवापसी  स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पुण्यात दाखल  लॉकडाऊन इफेक्ट  lockdown effect
दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची घरवापसी
author img

By

Published : May 18, 2020, 9:37 AM IST

पुणे - राज्यातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आलेली विशेष रेल्वे पुणे रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे 3:10 वाजण्याच्या सुमारास पोहोचली. या रेल्वेमधून एकूण 325 विद्यार्थी पोहोचले. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते. वैद्यकीय पथकामार्फत सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणीही संशयित आढळून आले नाही.

सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले. तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.