ETV Bharat / state

Eknath Shinde Meet Girish Bapat : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गिरीश बापटांची भेट, पुष्पगुच्छ देऊन केली तब्येतीची विचारपूस - Girish Bapat Health

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा व्यक्त केला आहे. पुणे दौऱ्यावर आसताना त्यांनी खासदार गिरीश बापट यांची सदिच्छा भेट घेतली. गिरीश बापट यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Eknath Shinde visit Girish Bapat
एकनाथ शिंदे गिरीश बापट
author img

By

Published : Feb 12, 2023, 7:47 AM IST

पुष्पगुच्छ देऊन तब्येतीची विचारपूस

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत दोन्हीही ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. दोन्ही पक्षाकडून आम्हीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अश्यातच आज या दोन्ही पोट निवडणुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या दोन्ही जागांवर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार तिथे काम आहेत. दोन्हीही ठिकाणी जनतेचा विश्वास असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे विजयी होणार आहेत. आज दोन्हीही ठिकाणी भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत. आज जनतेची कामे होत असून जनता दोन्ही उमेदवारांना विजयी करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मोशी येथे दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोशी येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर मी बोलण्याआधीच खासदार गिरीश बापट यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, काळजी करू नका. दोन्हीही ठिकाणी आपले उमेदवार हे विजयी होणार आहेत. ते जरी खासदार असले तरी त्यांनी एक कडवट कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी मला सांगितले आहे की मी इथे आहे काळजी करू नका. आपणच विजयी होणार आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तब्येत बरी नसल्याने सदिच्छा भेट : खासदार गिरीश बापट यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नाही. त्यांची सदिच्छा भेट देण्यासाठी मी आज आलो होतो. मी आणि खासदार गिरीश बापट आम्ही जुने मित्र आहोत. आम्ही एका कॅबिनेटमध्ये जुने मित्र म्हणून काम केले आहे. ते माझे जिवलग मित्र असल्याने मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बापट यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी आणि मी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते लवकरच बरे होऊन कामाला सुरूवात करणार आहेत. त्यांच्याजवळ दांडगा आत्मविश्वास आहे. ते लवकरच बरे होऊन जनतेच्या कामाला सुरूवात करतील. असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : maharashtra budget 2023 : २७ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, तिजोरी ठणठणाट असल्याने सरकारची अग्निपरीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.