ETV Bharat / state

वातावरणातील बदलामुळे टोमॅटो सडतोय शेतात, बळीराजा आर्थिक संकटात - पावसामुळे पुण्यातील टोमँटो शेती संकटात

नारायणगाव बाजारपेठ ही टोमॅटो विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून जगभरात टोमॅटो पाठवला जातो. मात्र, हाच टोमॅटो पाऊस व वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगराईचा शिकार बनला आहे.

टोमँटो शेती
author img

By

Published : Aug 13, 2019, 7:54 AM IST

Updated : Aug 13, 2019, 3:50 PM IST

पुणे - सततच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे या भागातील टोमॅटो पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीचा दुष्काळ आणि आता सुरू असलेला संततधार पावसामुळे येथील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

वातावरणातील बदलामुळे पुणे जिल्ह्यातील टॉमेटोचे पीक धोक्यात आले आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि खेड हे तालुके टोमॅटो उत्पादनात अग्रेसर तालुके म्हणून ओळखले जातात. या ठिकाणची नारायणगाव बाजारपेठ ही टोमॅटो विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून जगभरात टोमॅटो पाठवला जातो. मात्र, हाच टोमॅटो पाऊस व वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगराईचा शिकार बनला आहे. त्यामुळे मोठा भांडवली खर्च करुन उभारलेली टोमँटो शेती संकटात आली असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकण्याआधीच कच्चेच झाडांना सडत आहेत. पिकांच्या वाढीसाठी आणि टोमॅटोच्या फुगवणीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मात्र, सध्या खराब हवामानामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने संपूर्ण टोमॅटोची बागच सडून खराब होत आहे.

एक एकर टोमॅटो पिकवण्यासाठी शेती मशागत ठिंबक मल्चिंग लागवड फवारणी यासाठी साधारणता १ लाख ते सव्वा लाखांपर्यत खर्च येतो. मात्र, सध्या लाखो रुपये खर्च करुनही टोमँटोचे पिक शेतकऱ्यांच्या हातातून जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Intro:Anc__आधीचा दुष्काळ आणि आता सुरू असलेला संततधार पाऊस या मुळे बळीराजा शेतकरी पुरता हवालदिल झाला असून उत्तर पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता आता वाढल्या आहेत.सततच्या संततधार पावसामुळे या भागातील टोमॅटो पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.टोमँटो बाजारात पोहचण्याआधीच त्याचा शेतात लाल चिखल झाला आहे.

Vo_उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर खेड हे तालुके टोमॅटो उत्पादनात अग्रेसर तालुके म्हणून ओळखले जातात.या ठिकाणची नारायणगाव बाजारपेठ हि टोमॅटो विक्री ची मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून शेतकऱ्यांनी पिकवलेला नंबर वन टोमँटो जगभरात पाठवला जातो.परंतू हाच टोमॅटो पाऊस व वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगराईचा शिकार बनला आहे त्यामुळे मोठा भांडवली खर्च करुन उभारलेली टोमँटो शेती संकटात आली असल्याने शेतकरी चिंत्तेत सापडला आहे

Byte: कुंडलीक अरगडे (शेतकरी)

Byte:संदीप वाबळे (शेतकरी)

Vo__सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून,सध्या सुरू असलेला संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे टोमॅटो हे पिकण्या आधीच कच्चेच झाडांना सडले आहेत.पिकांच्या वाढीसाठी आणि टोमॅटो च्या फुगवणीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो परंतू सध्या खराब हवामानामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने संपुर्ण टोमॅटो चे बागच सडून खराब झाले आहेत.

Byte:निर्मला वाबळे (महिला शेतकरी)

Vo__एक एकर टोमॅटो पिकवण्या साठी शेती मशागत ठिंबक मल्चिग लागवड फवारणी या साठी साधारणता एक लाख ते सव्वा लाखांपर्यत खर्च येत आहे मात्र सध्या लाखो रुपये खर्च करुनही टोमँटोचे पिक शेतक-यांच्या हात जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे

End vo__कष्टकरी बळीराजा पोटच्या लेकरासारखं टोमॅटोच्या बागेचे संगोपन करत असताना उभं पिक जर सडून जात असेल तर जगावं तरी कसं अशा दुहेरी विवंचनेत बळीराजा शेतकरी सापडला आहे.Body:स्पेशल पँकेज..Conclusion:
Last Updated : Aug 13, 2019, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.