ETV Bharat / state

लोणावळ्यात मुकादमांचे फोटो चक्क फ्लेक्सवर; शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून अनोखी शक्कल - lonavala corporation cleaner news

थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरात ओळख असलेले लोणावळा शहर मोकळा श्वास घेत आहे. चकाचक रस्ते, परिसर कचरा आणि दुर्गंधीमुक्त झाल्याने शहराचा कायापालट झाला. शहरात ठिकठिकाणी झळकणारे फ्लेक्स हे त्याचे कारण आहे.

cleaners photo on flex, lonavala corporation initiative
लोणावळ्यात मुकादमांचे फोटो चक्क फ्लेक्सवर
author img

By

Published : Mar 20, 2021, 3:12 PM IST

Updated : Mar 20, 2021, 3:32 PM IST

लोणावळा (पुणे) - गाव असो की शहरे ती स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. मात्र, त्याच मुकादमांकडे समाज आणि प्रशासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना दिले जाणारे स्थान हे सर्वश्रुत आहे. देशात पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मात्र या मुकादमांना थेट फ्लेक्सवर स्थान देण्यात आले आहे. त्याचे सकारात्मक परिणामाचा अनुभवही शहरवासी घेत आहेत.

याबाबतच्या प्रतिक्रिया.

संकल्पनेमुळं मुकादमांना समाजात आदर -

थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरात ओळख असलेले लोणावळा शहर मोकळा श्वास घेत आहे. चकाचक रस्ते, परिसर कचरा आणि दुर्गंधीमुक्त झाल्याने शहराचा कायापालट झाला. शहरात ठिकठिकाणी झळकणारे फ्लेक्स हे त्याचे कारण आहे. प्रत्येक फ्लेक्सवर त्या परिसरातील मुकादमांचा फोटो, नाव, मोबाईल नंबर आणि त्यांनी करावयाच्या कामाचा तपशील नमूद आहे. या संकल्पनेमुळे मुकादमांना समाजात आदर मिळत आहे. त्यामुळेच मुकादमही चोख काम बजावत आहेत.

पूर्वीपेक्षा लोणावळा शहर अधिक सुंदर -

मुकादम निलेश सोनवणे म्हणाले की, गवळी वाडा प्रभागातील मी मुकादम असून माझी सर्व माहिती आणि कामांचा तपशील फ्लेक्सवर टाकण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांना येथील मुकादमांची माहिती आहे. त्यांना मदत लागल्यास ते ताबडतोब आमच्याशी संपर्क साधतात. मग आम्ही त्यांची समस्या सोडवतो. आम्ही दिवसातून दोन वेळा परिसर स्वच्छ करतो. नागरिकांचेही त्यावर लक्ष असते. त्यामुळे त्यांनाही फोन करायची वेळ येत नाही. या संकल्पनेमुळे पूर्वीपेक्षा शहर खूप स्वच्छ आणि सुंदर होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - कोरोना प्रतिबंधक बीएमसी महिला मार्शलला मारहाण

...तर थेट मुकादमांशी संपर्क साधा -

नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियानात लोणावळा शहराला आतापर्यंत तीन पारितोषिके मिळवली असून यामाध्यमातून 40 कोटींचं बक्षीस प्राप्त झाले आहे. आता आम्हाला प्रथम क्रमांक पटकवायचा आहे. त्यासाठी आम्ही शहरात 12 मुकादम नेमले आहेत. त्यांचे फोटो, नाव, मोबाईल नंबर आणि त्या परिसरात त्यांनी काय काम करायचं आहे? हे नमूद करणारे फ्लेक्स झळकवले आहेत. नागरिकांनी त्यांच्या परिसरात अस्वछता दिसली, दुर्गंधी पसरली तर थेट या मुकादमांशी संपर्क साधायचा आहे. संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यास त्यांनी नगरपरिषदेकडे तक्रार नोंदवायची आहे. मग आम्ही त्या मुकादमांवर कारवाई करणार आहोत. मात्र, आतापर्यंत आमच्याकडे एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने आमची ही संकल्पना सत्यात उतरत आहे.

शहरवासीयांकडून मुकादमांचं -

मुकादमांना थेट फ्लेक्सवर झळकवत शहरवासीयांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे. शिवाय या संकल्पनेचा ते फायदा घेत आहेत. स्थानिक नागरिक नंदू रावरंगी म्हणाले की, मुकादमांना फोन करताच ते तातडीने आमच्या परिसरात पोहचत आहेत. आमच्या तक्रारी गांभीर्याने घेत कचरा, गटार स्वच्छ करतात. त्यामुळे फ्लेक्स झळकविण्याची ही संकल्पना शहरासाठी खूप चांगली आहे.

हेही वाचा - पुण्यात कोरोनाचा थैमान असतानाही जम्बो कोव्हिड रुग्णालयाची वीज जोडणी कापली

Last Updated : Mar 20, 2021, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.