बारामती- इंदापूर तालुक्यातील बोरी येथे राहणाऱ्या विवाहितेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सासरच्या चार मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य गणपत कोळेकर, गणपत श्रीरंग कोळेकर, कल्पना गणपत कोळेकर (रा.मोशीजवळ जाधववाडी, चिंचवड), प्रियांका हेमंत वाघमोडे (रा. मठाचीवाडी, ता.फलटण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
किरण ऊर्फ सोनल अजिंक्य कोळेकर (वय २५, सध्या रा. बोरी) यांचा २४ फेब्रुवारी २०१९ रोजी अजिंक्यसोबत विवाह झाला होता. विवाहाच्या एका महिन्यानंतर माहेरच्या संपत्तीतून वाटा घेऊन ये म्हणत सोनलला सासरच्या नागरिकांनी त्रास देण्यास सुरुवात केली. एवढचं नाही तर दोन वेळा तिचा गर्भपातही करण्यात आला. अखेर छळाला कंटाळून सोनलने वालचंदनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली.