पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चर्चेमध्ये आहेत. मला या निवडणुकीत न्याय मिळाला मात्र मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला. तसेच मित्रपक्षावर भाजपने अन्याय केला नाही, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
रामदास आठवले यांची सदिच्छा भेट झाली असून मित्रपक्षांमध्ये चिन्हावरून कोणतीही नाराजी नाही. कोथरुडकरांनी विश्वास दिला तर मी राज्यात मोकळ्या मनाने फिरेल. याचबरोबर राज्यातील सर्व बंडखोर माघार घेतील अशी आशा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'भाजपमध्ये सगळ्यांना न्याय', चंद्रकांत पाटलांचे खडसेंच्या उमेदवारीवर स्पष्टिकरण
उद्धव ठाकरे यांची मुलखात मी पाहिलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाबाबत लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल. भाजप शिवसेना किती जागा लढते याला अर्थ नसून राज्याचा विकास महत्वाचा आहे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
हेही वाचा - पुण्यात चंद्रकांत पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज