ETV Bharat / state

'सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते?' - चंद्रकांत पाटील शिवसेना टीका

मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, असा उल्लेख आहे. सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते? सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारावी, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 3, 2020, 1:50 PM IST

पुणे - सावरकरांना समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना राहूच कशी शकते? सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारावी, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देऊन सावित्रीबाईंच्या स्मारकाला वंदन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सत्तेसाठी उद्धव ठाकरे किती लाचार होणार

एकनाथ खडसे यांची केंद्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. शिवसेनेकडे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि हुशार नेत्याला देण्यासाठी काहीच नाही, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा - एकनाथ खडसेंची नाराजी कायम; फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ

कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला अपयश आले. एकट्या भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावे लागले. सोलापूर आणि सांगलीमध्ये आम्ही विजयी झालो हेही लक्षात घ्या, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, असा उल्लेख आहे. ही खूप निंदनीय बाब असून रस्त्यावर उतरून याचा निषेध करणार आहोत. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

सत्तेसाठी शिवसेना आपल्या मूल्यांशी तडजोड करत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. मुलगा मंत्री झाला त्यामुळे त्यांना आता काही घेणे-देणे नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Intro:उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळाले, मुलाला मंत्रिपद आता त्यांना बाकी काही देणे घेणे नाही, नातीमुल्य नसलेले सरकार आहे, सावरकरांचा अपमान करणाऱ्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरेल -- चंद्रकांत पाटीलBody:mh_pun_01_chandrkant_patil_on_gov_7201348

anchor
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करावा असे या सरकारला आवाहन असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देऊन सावित्रीबाईंच्या स्मारकाला वादन केले...यावेळी पाटील यांनी राजकीय भाष्य देखील केले..एकनाथ खडसे यांची केंद्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा तसेच माझ्याशी भेट झाली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना आश्वस्त केले आहे. ते शिवसेनेत जातील म्हणण्याला काही अर्थ नाही. शिवसेनेकडे त्यांना देण्यासाठी आहे तरी काय असा प्रतिप्रश्न त्यांनी केला..
कोल्हापूर मध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली त्यामुळे अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावे लागले. सोलापूर आणि सांगली मध्ये मात्र आम्ही विजयी झालो हे पण लक्षात घ्या असे देखील पाटील म्हणाले...मंत्री मंडळ स्थापण्यासाठी उशीर आता अजूनही खाते वाटप नाही हे सरकार नेमकं चालले कसे अशी टीका करत
अजूनही अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या बघा काय होते ते माझें त्यांना चेलेंज असल्याचे पाटील म्हणाले
दरम्यान मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या त समलिंगी संबंध होते असा उल्लेख आहे. ही खूप निंदनीय बाब असून आम्ही आता रस्त्यावर उतरून निषेध करणार आहोत भाजप कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे मी त्यांना सांगितले असल्याचे पाटील म्हणाले आता
या विषयावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार आता प्रश्न आहे असे देखील पाटील म्हणाले, सध्या सरकारने नितीमुल्ये सोडली आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांचा काही पडलेल नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मुलगा कॅबिनेट मंत्री झाला आता बस, यांना बाकीच्यांशी काही घेणंदेणं नाही. दिवाकर रावते, भास्कर जाधव यांना त्यांनी डावललं असा टोला ही त्यांनी लगावला

Byte चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.