पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन आणि पाऊस असे सत्र सुरू आहे. दिवसा तीव्र उष्णता आणि दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने राज्यातील काही भाग झोडपून निघाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरूवारी मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत असलेली वाऱ्याची खंडितता म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आज तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विजांचा कडकडाट होण्याची शक्यता : हवामान विभागाने 20 ते 24 एप्रिल पर्यंत राज्यातील विविध भागातील अंदाज व्यक्त केले आहे. राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी आज आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र येथे देखील आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा येथे देखील आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
उष्णतेची लाट येण्याची शक्यता : मराठवाडा आणि वीदर्भ येथे देखील आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यात सुद्धा आकाश मुख्यतः निरभ्र राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अती हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी आहे, असे यावेळी हवामान विभागाच्या हवामान शास्त्रीय ज्योती सोनार यांनी सांगितले. तसेच 21 एप्रिलला देखील कोकण, गोवा या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच उष्णतेची लाट तुरळक ठिकाणी येण्याची शक्यता आहे.
पाऊस पडण्याची शक्यता : मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा येथे देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भ येथे देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 22 ते 24 एप्रिलपर्यंत कोकण, गोवा या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता तसेच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र येथे देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Lightning Reason : विजा कोणत्या ठिकाणी जास्त पडतात आणि का पडतात? घ्या जाणून