ETV Bharat / state

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याची गळती; आवर्तन बंद - chaksman dam lick in pune

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात साडेपाचशे क्यूसेक वेगाने १७ मार्चला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले. ४५, ४५ असे ९० दिवसांचे १५ जूनपर्यंत चालणारे हे आवर्तन आहे. सध्या धरणात २.८५ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्यात ७२ किलोमीटर अंतर वाहतो.

chaksman-dam-lick-in-pune
chaksman-dam-lick-in-pune
author img

By

Published : May 3, 2020, 3:58 PM IST

पुणे - राजगुरुनगरजवळील पाण्याच्या पुलातून मोठी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी तर होतच आहे शिवाय कालवा फुटीचा धोका आहे. त्यामुळे चासकमान धरणातून सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन तातडीने बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा- COVID-19: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात साडेपाचशे क्यूसेक वेगाने १७ मार्चला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले. ४५, ४५ असे ९० दिवसांचे १५ जूनपर्यंत चालणारे हे आवर्तन आहे. सध्या धरणात २.८५ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्यात ७२ किलोमीटर अंतर वाहतो. चासकमानच्या डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात असून माती भराव असलेल्या पुलाला यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीगळतीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आल्याची माहिती चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांनी दिली.

सध्याचा उन्हाळी परिस्थिती व कोरोनाचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी संकटात आहे. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे कालव्यालगत असणाऱ्या शेतीत पाणीच-पाणी होत असल्याने थेतीचे नुकसान होते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.