ETV Bharat / state

#Lockdown : राजगुरुनगर मधील 15 दुकानांवर कारवाई, तर 7 दुचाक्या जप्त - दुकानांवर कारवाई

संचारबंदीच्या काळात विनाकारण राजगुरूनगरात फिरणाऱ्या 7 दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून सामाजिक अंतराची सोय न करणाऱ्या 15 दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुकानासमोर झालेली गर्दी
दुकानासमोर झालेली गर्दी
author img

By

Published : Apr 1, 2020, 1:37 PM IST

पुणे - संचारबंदी असतानाही राजगुरूनगर शहरामध्ये सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या 15 दुकानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरणाऱ्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

देशात संचारबंदी करत आपात्कालीन कायदा लागू करण्यात आला असून आज सातवा दिवस आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागत आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तू पुरवणारी दुकाने नियमांचे पालन न करता दुकाने सुरु ठेवण्यात आली होती. नागरिक सामाजिक अंतर अजिबात पाळत नसल्याने आजार बाळावण्याची भीती निर्माण झाली आहे.

खेड पोलीस आणि खेड प्रशासनाकडून नागरिकांना दुकानदारांना वारंवार सूचना करूनही नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनी यापूर्वी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप दिला होता. तरीही नियमांचे पालन केले जात नसल्याने पोलिसांनी आजपासून कडक भूमिका घेतली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी त्यांच्या पथकाने शहरातील वाडा रोड वरील श्री मार्ट सह सुमारे 15 दुकांदारांवर सामाजिक अंतर ठेवण्याची व्यवस्था न केल्यामुळे भा.द.वि. 188, राष्ट्रीय आपत्ती वयवस्थापन कायदा कलम 51 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यासह विनाकारण फिरणाऱ्यांच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

हेही वाचा - नामी शक्कल लढवत टरबूजविक्री; बारामतीमधील शेतकऱ्याचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.