पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या चंद्ररंग कन्स्ट्रक्शन कार्यालयावर अज्ञात तिघांनी रॉकेलने पेटवलेल्या दोन बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी माहिती दिली आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या चंद्ररंग कन्स्ट्रक्शनच्या कार्यलयावर अज्ञात तीन तरुणांनी रॉकेलने पेटलेल्या दोन बाटल्या फेकल्या. या घटनेत सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र, कार्यलायच्या काचेच्या बाजूला या फेकल्या गेल्याने खळबळ उडाली. घटनेनंतर सांगवी पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करा, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
हेही वाचा - Sangli : तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करणारा विकृत पोलीस कर्मचारी निलंबित