ETV Bharat / state

अनिल देशमुखांविरोधात भाजपाची बारामतीत घोषणाबाजी - Baramati bjp news

शहरातील भिगवन चौकात एकत्र जमून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

BJP agitation
BJP agitation
author img

By

Published : Mar 21, 2021, 1:25 PM IST

Updated : Mar 21, 2021, 2:47 PM IST

बारामती - महाविकास आघाडी सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहरातील भिगवन चौकात एकत्र जमून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

विविध मुद्द्यांवर केले आंदोलन

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करूनही संपूर्ण कर्जमाफी दिली नाही. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करूनही सदरची रक्कम जमा केली नाही. शेतकऱ्यांच्या शेती व घरगुती विजेची जोडणी तोडली. बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन बंद केले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्याने होणारा पाझर बंद होऊन अनेक विहिरी व बोअर कोरडे पडून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. या मुद्द्यांवरून आज भाजपाच्या वतीने सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

कार्यकर्ते ताब्यात

आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खंडणीखोर सरकारचा निषेध असो, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू झालीच पाहिजे, अशा घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करून पायदळी तुडविण्यात आले. दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Last Updated : Mar 21, 2021, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.