इंदापूर (पुणे) - भाजप कार्यालयासमोरील तमाशा बंद थांबवा. अन्यथा, राज्यभर तांडव होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा नेते, आमदार आशिष शेलार म्हणाले, की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली. संयम सगळ्यांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री पदाबाबत नक्कीच ठेवला पाहिजे, त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली आहे. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा.
शिवसेनेला गर्भित इशारा-
पुढे आशिष शेलार म्हणाले, की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारच्या पोलिसांच्यावतीने अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही संपूर्णत: निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला यातला गर्भित इशारा आम्ही देउ इच्छितो. तुम्ही सुरुवात केली आहे, त्याचा शेवट आम्ही करू. राज्य सरकारचे वागणे पाहून तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, एवढी झुंडशाही महाविकास आघाडीची लोक करत आहेत.
हेही वाचा-आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे
आमच्याकडे सीडी आहे, हे लक्षात ठेवा-
भाजपा नेते शेलार म्हणाले, की नारायण राणे यांच्यावर कारवाई केल्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिप सुद्धा बाहेर आली आहे. राणे यांना स्वत: सांगितले, की मी गुन्हा केलेला नाही. कुणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होत असतील तर मग तुम्ही क्लिप दाखवित आहात. आमच्याकडे सीडी आहे, हे लक्षात ठेवा. जर त्या सीडी बाहेर आल्या तर महाविकास आघाडी मधील जे पक्ष आता मांडीला मांडी लावून बसलेलेत तेच कमेकांवर केसेस दाखल करतील, अशा त्यांनी इशारा दिला.
हेही वाचा-नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO