पुणे - जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसमोर अतुल देशमुख यांनी भाजपातून बंडखोरी केली आहे आणि अपक्ष म्हणून ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांच्या प्रचारात आता भाजप उतरली आहे. रविवारी राजगुरुनगर येथे राजगुरूनगर परिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक एकत्रित येऊन क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला हार घालून संपूर्ण राजगुरुनगर शहरातून पदयात्रा काढण्यात आली.
हेही वाचा - राजकीय 'सुपर संडे'ला नागपुरात मोठ्या नेत्यांची नाही जाहीर सभा
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि दोन जिल्हा परिषद पंचायत समिती असे भाजपचे स्वतंत्र स्थान या मतदारसंघात आहे. मात्र, राज्यात शिवसेना व भाजप युती झाल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. म्हणून या मतदारसंघात ताकद असतानाही उमेदवारी न मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेऊन घेतला. त्यामुळे खेड तालुक्यातील स्थानिक भाजप व नगरपालिकांचे नगराध्यक्ष व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे सर्वजण देशमुख यांच्या प्रचारात जाहीरपणे उतरल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे देशमुख यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी
अतुल देशमुखांच्या प्रचारात कबुतरांची गगनभरारी -
खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात तरुण वर्गातून अतुल देशमुख यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. यात आता भाजपही जाहिरपणे मैदानात उतरला आहे. प्रचारासाठी आज कबुतरांचा वापर केला जात आहे. राजगुरुनगर येथील भाजपच्या नगरसेवकांच्या पदयात्रेत कबुतरांची गगनभरारी करण्यात आली.