ETV Bharat / state

धक्कादायक! पुत्रप्राप्ती आणि गुप्त धनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार - पुणे लैंगिक अत्याचार न्यूज

एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. मुलींवर अत्याचार करुन ३ लाख ११ हजार रुपयांची फसवणूकही केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२ रा. खैरेवाडी जि. रायगड) या आरोपीला अटक केली आहे.

molester
अत्याचार करणारा भोंदू बाबा
author img

By

Published : Feb 25, 2020, 3:42 PM IST

Updated : Feb 25, 2020, 3:54 PM IST

पिंपरी-चिंचवड: एका भोंदू बाबाने गुप्त धन आणि पुत्र प्राप्तीसाठी उतारा काढण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२ रा. खैरेवाडी जि. रायगड) असे या आरोपीचे नाव आहे. भोंदू बाबावर लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, नरबळी आणि अमानूष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच बहिणींवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार

घरामध्ये पुत्र प्राप्ती होवू नये म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर नात्यातील एका महिलेने करणी केलेली आहे. घराच्या एका खोलीमध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी, गुप्तधन मिळवण्यासाठी आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरामध्ये तीन उतारे आणि विवस्त्र होऊन पूजा करावी लागेल, असे आरोपी सोमनाथने फिर्यादी कुटुंबाला सांगितले.

भोंदू बाबाला फाशीची शिक्षा देण्याची अंनिसची मागणी

हेही वाचा - कर्जमाफी, महिला अत्याचाराबाबत विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

कुटुंबातील मुलींना उतारा करण्याच्या बहाण्याने खोलीमध्ये घेवून दार बंद केले. फिर्यादीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आई-वडिलांना दैवी शक्तीने आणि काळया जादूने मारुन टाकण्याची धमकी दिली. मुलींवर अत्याचार करुन ३ लाख ११ हजार रुपयांची फसवणूकही केली. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबाची मदत करत आरोपीला अटक केली.

Last Updated : Feb 25, 2020, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.