पुणे - भीमाशंकर, भोरगिरी, चासकमान व डिंभे धरण व आहुपे परिसरात पर्यटन व देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा समुह संसर्ग वाढू नये, यासाठी बंदी घातलण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीसनाके बंदी लावण्यात आली असून, भाविक व पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा उपविभागिय पोलीस आधिकारी गजानन टोंम्पे यांनी दिला.
चासकमान धरण, भोरगिरी व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर व डिंभे धरण,आहुपे परिसरात पावसाळ्यात निसर्गाचे रुप डोळे दिपवून टाकणारे असते. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे या पर्यटनस्थळी कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भिती निर्माण होते. त्यामुळे धार्मिक व पर्यटन स्थळावर येण्यासाठी बंदी घालण्यात आली असून, महत्वाचे रस्ते व पर्यटनस्थळांवर आदेशाची माहिती देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच, ठिकठिकाणी पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या भागातील पोलीस पाटील यांना माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांनी सांगितले.
भीमाशंकर परिसरातील सह्याद्री पर्वत रांगाच्या आदिवासी भागात मुंबई-पुणे व इतर राज्यांतून पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. या परिसरातून बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शनासाठी जाता येते. तसेच, या परिसरातील भोरगिरी परिसर,भोरगड, नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉइंट, डिंभे व चासकमान धरण,कोंढवळ धबधबा, आहुपे यांसह भीमाशंकर अभयारण्यात निसर्गाचा मनमुराद आनंद व देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. येथील माळीण व आहुपे परिसराल भात शेती डोंगरदऱ्या धबधबे पाण्यासाठी विशेष गर्दी होते. तालुक्यातून जाणारी बुब्रा व घोड नदी परिसरातील दृष्य रोमहर्षक असतात.
भीमाशंकर, सह्याद्रीच्या खोऱ्यात धार्मिक व पर्यटनस्थळावर येण्यास बंदी; उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार - भिमाशंकर पर्यटनस्थळावर बंदी
भीमाशंकर व सह्याद्रीच्या खोऱ्यात धार्मिक व पर्यटनस्थळावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा समुह संसर्ग वाढू नये, यासाठी बंदी घातलण्यात आली आहे. भाविक व पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा उपविभागिय पोलीस आधिकारी गजानन टोंम्पे यांनी दिला.
![भीमाशंकर, सह्याद्रीच्या खोऱ्यात धार्मिक व पर्यटनस्थळावर येण्यास बंदी; उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार Ban on tourist sites in Bhimashankar and Sahyadri valleys in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7682710-565-7682710-1592561044004.jpg?imwidth=3840)