पुणे - आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज (गुरूवार) सकाळी पोलीस बंदोबस्तात महापालिकेचे कर्मचारी हजर झाले. परंतु स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. काही नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचाही प्रयत्न केला.
बिल्डराच्या हितासाठी आंबील ओढ्यात कारवाई; आंबील ओढ्यातील नागरिकांनी व्यक्त केला संताप
पुण्यातील आंबील ओढ्यात महापालिकेच्यावतीने आज सकाळपासून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने ही जी कारवाई करण्यात येत आहे ती बेकायदेशीर असून बिल्डरांच्या हितासाठी आज पहाटेच अश्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. असा आरोप यावेळी येथील स्थानिकांनी केला आहे. एकूणच येथील स्थानिकांच्या काय मागण्या आहे. त्यांचा या अतिक्रमण कारवाईला का विरोध होत आहे. या विषयी येथील नागरिकांशी चर्चा केलीय आमच्या प्रतिनिधीने...
स्थानिक आणि प्रशासन आमने-सामने
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत असताना स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. कारवाईला विरोध करत आंबिल ओढा इथे आंदोलनादरम्यान एका नागरिकांने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पूर्व सुचना न देताच ही कारवाई - स्थानिकांचा आरोप
यावेळी स्थानिकांनी महानगरपालिकेच्या कारवाईला विरोध करत आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे. कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देताच ही कारवाई केली आहे. असा आरोप स्थानिकांनी केली जात आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...