ETV Bharat / state

अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी - अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीकडून छापेमारी

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. या स्पष्टीकरणानंतर देखील ईडीने जगदीश कदम यांच्या घरावर आज धाड टाकली.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Oct 28, 2021, 10:35 PM IST

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी केली आहे. पुण्यातील राहत्या घरी गुरुवारी सकाळपासून ईडीची झाडाझडती सुरु आहे. कदम हे दौंड साखर कारखान्याचे संचालक आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली होती. तसेच पवारांच्या पुणे आणि कोल्हापूरातील कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आली होती.

कोण आहेत जगदीश कदम?

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. या स्पष्टीकरणानंतर देखील ईडीने जगदीश कदम यांच्या घरावर आज धाड टाकली.

किरीट सोमैया यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमैया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - पंचांची विश्वासार्हता नसल्याने एनसीबीची बाजू कमकुवत..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.