पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. शहरात अवैध शस्त्रांची विक्री वाढली असून याप्रकरणा पोलिसांनी पिस्तूल विक्री करणाऱ्या तीन जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दिलीप प्रेमनारायण तिवारी, सगुण कुमार राय आणि चंदन कुमार राय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चार हत्येचा आरोपी अटकेत : या आरोपींमधील दिलीप तिवारी याच्यावर मुंबईतील वसई येथे 4 जणांची हत्या आणि 2 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याला दुहेरी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा देखील मिळाली होती. परंतु, कोविड काळात तो पॅरोलवरती बाहेर आला असून तो पुन्हा जेलमध्ये गेलेला नाही. आता भोसरी पोलिसांनी त्याला शस्त्र विक्रीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
अशी करण्यात आली कारवाई : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात अज्ञात तीन व्यक्ती हे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. भोसरी पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून तीन जणांना अटक केली. दरम्यान, यात कुप्रसिद्ध असा गुन्हेगार दिलीप प्रेमनारायण तिवारी हा देखील होता. त्याच्यावर मुंबईतील वसईत चार जणांची हत्या तर दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न असे 6 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देखील मिळाली होती. परंतु कोविड काळात तो पॅरोलवरती बाहेर आला होता, नंतर तो पुन्हा जेलमध्ये गेलाच नाही. दरम्यान त्याने पिस्तूल विक्री करण्याचे काम सुरू केले होते. तिवारी आणि त्याचे इतर साथीदार भोसरीत पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच्यासह तीन जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने करण्यात आली होती. या टीमने या तिघांना अटक केली आहे.
हेही वाचा-