ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून करून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

author img

By

Published : Aug 1, 2020, 5:36 PM IST

एकतर्फी प्रेम प्रकरणातून विवाहित महिलेचा खून करून स्वतः आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात घडली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.

accused-attempted-suicide-by-murdering-a-married-woman-in-pune
एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून करून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे - एकतर्फी प्रेम प्रकरणातून विवाहित महिलेचा खून करून स्वतः आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात घडली आहे. महिलेच्या पोटात चाकू भोसकून स्वतः आरोपीने पोटावर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राणी सतीश लांडगे (वय- 29), असे मृत महिलेचे नाव असून अरविंद शेषेराव गाडे (वय- 30) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राणी सतीश लांडगे आणि आरोपी अरविंद शेषेराव गाडे हे दोघेही अजिंठानगर परिसरात शेजारी राहात होते. दोघेही विवाहीत आहे. आरोपी अरविंदचे राणीवर एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद राणीला फोन करून बोलण्याचा नेहमी आग्रह करत होता. दरम्यान, एक महिन्यापूर्वी या प्रकरणाची माहीती राणीच्या पतीला मिळाली. त्याने अरविंदला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राणीचा मोबाईल नंबर देखील बदलण्यात आला. यामुळे अरविंद संतापला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी राणी कामावरून घरी परतत असताना आरोपीने तिचा रस्ता अडवला आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागला. तिने बोलण्यास नकार देताच स्वतः जवळील चाकू काढून राणीच्या पोटात भोसकला. त्यानंतर त्याने स्वतः च्या पोटावरही वार केले. भर रस्त्यात घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत मृत महिलेला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॅाक्टरांनी तिला मृत घोषित केले, तर आरोपी अरविंदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत राणीच्या पतीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.

हेही वाचा - 8 कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवत डॉक्टरची 40 लाखांची आर्थिक फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.