ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडको देणार परवडणारी घरं; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट काय म्हणाले? - Sanjay Shirsat CIDCO President - SANJAY SHIRSAT CIDCO PRESIDENT

Sanjay Shirsat CIDCO President : 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत, सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडको महामंडळ 47 हजार घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती दिलीय. यात गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. दलाल गैरव्यवहार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

Sanjay Shirsat CIDCO President
संजय शिरसाट (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 8:30 PM IST

मुंबई Sanjay Shirsat CIDCO President : मुंबई आणि उपनगरात नुकतीच म्हाडाची लॉटरी निघाली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडको महामंडळही 47 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. ही घरं सर्वसामान्यांना परवडणारी असतील. अर्जदारांनी या घरांसाठी अर्ज करताना कोणत्याही दलालाची मदत घेऊ नये. अर्ज प्रामाणिकपणे सादर करावेत. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. दलाल गैरव्यवहार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार व सिडको महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिला. गुरुवारी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शुक्रवारी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली.

आमदार संजय शिरसाट यांची खास मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

सिडकोचा कायापालट करणार : सिडकोमध्ये अनेक महत्त्वाची व सामान्यांच्या हिताची कामं करावयाची. सिडकोत माझ्यासमोर आव्हानं असली, तरी ती आव्हानं पेलून सिडकोमध्ये कायापालट करेन, असा माझा निर्धार असल्याचं संजय शिरसाठ यांनी सांगितलं. "नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. तसंच सिडकोच्या 47 हजार घरांची लॉटरी नवी मुंबईत निघणार आहे. ही घरं अत्यंत कमी किमतीत आणि सर्वसामान्यांना परवडणारी असतील," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : विधानसभा निवडणुकीला महिनाभराचा कालावधी उरला असतानाच आणि त्यापूर्वीच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले आमदार संजय शिरसाट हे बऱ्याच दिवसांपासून नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करून त्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. विरोधकांच्या या आरोपाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, "मी अजिबात नाराज नाही, मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार. एक महिना असो किंवा त्याहून अधिक कालावधी असो, मला जी काही संधी मिळेल, त्यात मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. विरोधक काय बोलतात याची मला पर्वा नाही. विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत," असा पलटवार आमदार संजय शिरसाट यांनी केला.

हेही वाचा

  1. "लोकसभेत काँग्रेसच्या जागा शिवसेनेमुळं..."; संजय राऊतांनी डिवचलं - Sanjay Raut
  2. कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - CM DCM Slams Vijay Wadettiwar
  3. बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी; तिसऱ्या आघाडीचं नाव ठरलं 'परिवर्तन महाशक्ती', 288 जागांवर लढवणार निवडणूक - Third Alliance In Maharashtra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.