ETV Bharat / state

पुण्याच्या महाकाली टोळीतील आरोपीला पोलिसांनी फिल्मीस्टाईलने घातल्या बेड्या - police news

पुण्याच्या महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगार सागर इंद्रा याला हिंजवडी पोलिसांनी फिल्मीस्टाईलने पकडले आहे.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 23, 2019, 11:47 PM IST

Updated : Sep 23, 2019, 11:54 PM IST

पुणे - फरार असलेला सराईत आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो महाकाली टोळीतील सदस्य आहे. त्याच्याकडून 4 गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. सागर कुमार इंद्रा ( वय 27 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपीसह पोलीस पथक

तो हडपसर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून हिंजवडीमधील अपहरणाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्यानुसार त्याचा शोध पोलीस घेत होते. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, आरोपी सागर हा घोटावडे येथून हिंजवडीकडे येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदशनाखाली दोन पथक तयार करण्यात आले. हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला, पोलिसांनी तो सागर असल्याचे ओळखले. मात्र, त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला. त्याचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले.

हेही वाचा - चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार

त्याच्याकडे चौकशी केली असता 4 पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे, असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड, महेश वायबसे, किरण पवार, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, आतिक शेख, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, अमर राणे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा - रेल्वेच्या आरक्षण केंद्रातून 44 लाखांच्या रकमेची चोरी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील घटना

Intro:mh_pun_03_av_pistol_mhc10002Body:mh_pun_03_av_pistol_mhc10002

Anchor:- फरार असलेला सराईत आरोपी ला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो महाकाली टोळीतील सदस्य आहे. त्याच्याकडून चार गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. सागर कुमार इंद्रा वय-२७ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो हडपसर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून हिंजवडीमधील अपहरण गुन्ह्यात फरार होता. संबंधित आरोपी सागर हा सराईत गुन्हेगार आहे. तो पिंपरी-चिंचवड पोलिसांना हवा होता. त्यानुसार त्याचा शोध पोलीस घेत होते. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना गुप्तमाहिती मिळाली की, आरोपी सागर हा घोटावडे येथून हिंजवडीकडे येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदशनाखाली दोन पथक तयार करण्यात आले. हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला, पोलिसांनी आरोपी सागर असल्याचे ओळखले, मात्र त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला. पोलिसांनी हार मानली नाही. त्याचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चार पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली. असा ऐकून १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आहे. सराईत गुन्हेगार हा महाकाली टोळीतील सदस्य आहे. त्याच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड, महेश वायबसे, किरण पवार, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, आतिक शेख, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, अमर राणे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.