ETV Bharat / state

रांजणगाव, चाकण एमआयडीसीत उद्योग सुरू, मात्र कामगार पुणे अन् पिंपरी-चिंचवडचा नको - ranjangaon MIDC

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव व चाकण एमआयडीसीमधील काही कंपन्या सुरू होत आहेत. मात्र, या कंपन्यांना सरकारची नियमावली पाळणे बंधनकार आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून कुठल्याही कामगार आणि अधिकाऱ्याला एमआयडीसीमध्ये कामावर जाता येणार नाही.

रांजणगाव औद्योगिक वसाहत  चाकण औद्योगिक वसाहत  ranjangaon MIDC  chakan MIDC
रांजणगाव, चाकण एमआयडीसीत उद्योग सुरू, पण कामगार पुणे अन् पिंपरी-चिंचवडचा नको
author img

By

Published : Apr 20, 2020, 12:59 PM IST

पुणे - रांजणगाव व चाकण औद्योगिक वसाहतीत आजपासून राज्यसरकारच्या नियमावलीनुसार उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात मजूर आणि अधिकारी असे कुठलेच कर्मचारी कामावर येणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, कामगार येणार कुठून? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. कंपन्या सुरू करून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

रांजणगाव, चाकण एमआयडीसीत उद्योग सुरू, पण कामगार पुणे अन् पिंपरी-चिंचवडचा नको

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव व चाकण एमआयडीसीमधील काही कंपन्या सुरू होत आहेत. मात्र, या कंपन्यांना सरकारची नियमावली पाळणे बंधनकार आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून कुठल्याही कामगार आणि अधिकाऱ्याला एमआयडीसीमध्ये कामावर जाता येणार नाही. तसेच ग्रामीण भागातील हॉटस्पॉट वगळता इतर भागातील कामगारांना घेऊनच कारखाना सुरू करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या भागातून आलेल्या कामगारांनाही घरी जाता येणार नाही. या कामगारांची राहण्याची व्यवस्था ही कंपनीतच करावी लागणार असल्याचे दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.