पुणे - राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा बुरुजावरून खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला. काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अनुराग अनिल राक्षे (वय 19, रा. भायखळा) असे तरुण ट्रेकरचे नाव आहे. तो 16 जणांच्या एका ग्रुपसह ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर आला होता.
हेही वाचा - पुण्यात शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग राक्षे हा आपल्या मित्रांसह राजगड किल्ल्यावर काल सकाळच्या सुमारास आला होता. गडावरील पद्मावती माचीच्या बाजूने सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो सेल्फी काढत असताना त्याच्या हातातील पावर बँक खाली पडली. ही पावर बँक काढत असताना त्याचा तोल गेला आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून तो खाली कोसळला. अंदाजे एक हजार फूट खोल दरीत कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, तरुण किल्ल्यावरून खाली कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अनुरागचा मृतदेह गुंजवणी गावात आणला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी हा मृतदेह रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी - रोहित पवार