ETV Bharat / state

अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना पुणे जिल्ह्यातील जवान हुतात्मा

मागील दीड महिन्यापूर्वी संभाजी राळे हे सुट्टीवर आपल्या परिवारासोबत एक महिना राहिले होते. त्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तब्येत खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली.

Sambhaji Rale Martyr news
पुणे जिल्ह्यातील जवान हुतात्मा
author img

By

Published : Jan 7, 2021, 4:54 PM IST

Updated : Jan 7, 2021, 10:30 PM IST

पुणे - अरुणाचल प्रदेशात सैन्य दलात कर्तुत्वावर असताना महाराष्ट्रातील एक जवान हुतात्मा झाला आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय ३०, ता. खेड, कुरकुंडी) असे जवानाचे नाव आहे.

खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे कर्तव्य बजावत असताना अरुणाचल प्रदेशातील तेजपुर येथे हुतात्मा झाले. संभाजी राळे यांचे पार्थिव उद्या सकाळी ८:३० वाजता लोहगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून कुरकुंडी येथील शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडेदहा वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

मागील दीड महिन्यापूर्वी संभाजी राळे हे सुट्टीवर आपल्या परिवारासोबत एक महिना राहिले होते. त्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तब्येत खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली. राळे यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार असून संभाजी हे परिवारात एकुलते एक होते.

हेही वाचा - पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात कुत्र्यांनी केली चार हरणांची शिकार

Last Updated : Jan 7, 2021, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.