दौंड (पुणे) - दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगारास दौंड शहरातील नगर मोरी चौक येथे सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले आहे. या आरोपीस दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशावरून रेकॉर्डवरील फरार आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवित येत आहे . दौंड पोलीस ठाण्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून हवा असलेला माऊली बंट्या भोसले (वय 21 वर्षे, रा. बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे) हा दौंड नगर मोरी चौक येथे येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. यावरून नगर मोरी चौक येथे सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
या आरोपीवर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथेही आहे गुन्हा दाखल
या आरोपीवर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाणे (जि. अहमदनगर) येथे गुन्हा दाखल आहे. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.