पुणे- शॉर्टसर्किटमुळे एका धावत्या इंडिका कारने पेट घेतल्याची थरारक घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सुदैवाने या घटनेत चालक बचावला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.
मध्यरात्री चालक राहुल चौधरी हा इंडिका (एम.एच.12-GZ-6959) घेऊन देहूगावमधून पुण्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, भरधाव वेगात असताना अचानक कारमधूनधूर निघत असल्याचे चालक राहुलच्या लक्षात आले. मोटार बाजूला घेऊन तो तातडीने खाली उतरला एवढ्यातच गाडीने पेट घेतला. क्षणार्धात गाडी जळून खाक झाली. ही घटना मध्यरात्री देहूगावमध्ये सम्राट जिमच्या समोर घडली आहे. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज चालकाने व्यक्त केला.
मुंबई-पुणे महामार्गावर अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी बरनिंग कारचा थरार नागरिकांनी अनुभवला होता. अशा घटनांवेळी चालकाने तातडीने बाहेर पडणे महत्वाचे असते.