पुणे - शहरात रविवारी दिवसभरात कोरोनाबाधित तब्बल 69 रुग्ण आढळले असून पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1139 इतका झाला आहे. आज दिवसभरात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांचा आकडा 72 वर जाऊन पोहोचला आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी पुणेकरांच्या दृष्टीने चिंता वाढविणारी आहे.
आज ससून रुग्णालयातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत तिघेही पुरुष आहेत, तर अजूनही 44 गंभीर रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याशिवाय कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या चार रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या 1139 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 72 रुग्णांचा मुत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 164 बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. 902 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.