पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1876 झाली आहे. 361 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1414 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 101 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 78 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागातील स्थिती -
पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2087 झाली आहे. विभागातील 410 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1566 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण बाधित 52 तर मृत्यू 2, सोलापूर जिल्ह्यात 111 कोरोनाबाधित तर 6 जणांचा मृत्यू, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बाधित 14 मृत्यू 1 आणि सांगलीमध्ये एकूण बाधित 32 मृत्यू 1 आहे.
पुणे विभागामध्ये एकूण 21599 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 20767 चा अहवाल प्राप्त आहे. 832 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 18613 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2087 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 6904918 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,68,56,918 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1590 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.