ETV Bharat / state

गणेशोत्सव; शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 14 आरोपींना केले तडीपार - पोलिसांनी आरोपींना केले तडीपार

पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीतून पाठीमागील वर्षात जवळजवळ चाळीस लोकांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आलेले होते .

police
दौंड पोलीस स्टेशन
author img

By

Published : Aug 20, 2020, 9:55 PM IST

पुणे - दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीतील १४ गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार केले आहे. या लोकांवर दोन पेक्षा जास्त, मारामारी, जबरी चोरी, विनयभंग दारूविक्री यासारखे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गुन्हेगारांचे क्राइम रेकॉर्ड अद्यावत करण्यात येत आहेत. यात दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की तात्काळ तडीपारीची कारवाई करण्यात येते. दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठीमागील वर्षात जवळजवळ चाळीस लोकांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आलेले होते.
2020 मध्ये सुद्धा तडीपार प्रस्ताव पाठवण्यात आले होते. पोलीस अधीक्षक यांनी 14 लोकांना तडीपार केलेले आहे.

तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे

दीपक रल विधाते, पंकज निमजे, जॉय नवगिरे, शाहिद शेख, राहुल कमप्लीकर, लिंगाप्पा अमात्य चूनुर, सोनू शेटे, मनोज नरळे, सुरज होसमाने, सागर कांबळे, लखन सरवय्या, सागर अल्लाट, सुशांत कांबळे, विशाल काटकर अशी तडीपार केलेल्या लोकांची नावे आहेत.

या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगार परत विनापरवाना दौंडमध्ये दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर याच लोकांच्यावर पुन्हा झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत किंवा संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे .

सदर कारवाई राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस नाईक बोराडे, वारे, सहाय्यक फौजदार भाकरे, पोलीस हवालदार शिंगाडे, पोलीस हवालदार आसिफ शेख, पांडुरंग थोरात , यांसह दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.