ETV Bharat / state

योग दिवस विशेष; दहा वर्षाच्या मुलांनी योग दिनानिमित्त दिले 'ऑनलाईन धडे' - दहा वर्षाच्या मुलांनी दिले योगाचे धडे

अवघ्या दहा वर्षांच्या मुलांनी सोशल माध्यमाच्या सहायाने इतरांना ऑनलाईन धडे दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहज अनिल शर्मा आणि स्वयंम अनिल शर्मा अशी जुळ्या भावांची नावे असून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून इतर मित्र परिवाराला योगाचे धडे दिले आहेत.

pune
योगा करताना चिमुकले
author img

By

Published : Jun 20, 2020, 7:36 PM IST

Updated : Jun 21, 2020, 11:12 AM IST

पुणे - योग दिवसानिमित्त महाकवी जयशंकर प्रसाद फाऊंडेशनमार्फत अवघ्या दहा वर्षांच्या मुलांनी सोशल माध्यमाच्या सहाय्याने इतरांना ऑनलाईन धडे दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहज अनिल शर्मा आणि स्वयंम अनिल शर्मा अशी जुळ्या भावांची नावे असून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून इतर मित्र परिवाराला योगाचे धडे दिले आहेत. यात शेकडो जण सहभागी झाले होते. अवघ्या दहा मिनिटांच्या या शिकवणीत अनेकांनी प्रश्न करत योग करणे किती महत्वाचे आहे, हे या चिमुकल्यांनी सांगितले.

योग दिवस विशेष; दहा वर्षाच्या मुलांनी योग दिनानिमित्त दिले 'ऑनलाईन धडे'

पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात सहज आणि स्वयंम हे आई-वडिलांसह राहतात. आज योग्य दिवस असल्याने त्यांनी श्री श्री रविशंकर फाउंडेशन मार्फत ऑनलाईन धडे इतरांना द्यायचे ठरवले होते. त्यानुसार दुपारच्या सुमारास दोन मुलींच्या मदतीने शहरातील लहान मुलांना योग्य कसा करायचा हे ऑनलाईन शिकवले. तसेच सहजने ते करून दाखवत इतरांना शिकवले आहे.

या दहा मिनिटांच्या ऑनलाईन शिकवणीत सूर्य नमस्कार, ताडासन, वृक्षासन, गरुडासन, नटराज आसन, त्रिकोनासन, शीर्षासन, चक्रासन आदी असे करण्यात आले आहेत. अवघ्या भारतासह जगभरात आजचा दिवस हा योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळे या लहान मुलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून इतरांपर्यंत योगासन पोहोचावे म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सहज म्हणतो की, आपण दररोज योगा केला तर आपली प्रकृती चांगली राहते, तसेच बुद्धीला चालना मिळते असेही तो सांगतो.

Last Updated : Jun 21, 2020, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.