ETV Bharat / state

Three Died in Accident at Parbhani : पालमजवळ कार अ्न जीपचा अपघात, तिघांचा मृत्यू - तिघांचा जागीच मृत्यू

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या पेठशिवणी परिसरात भरधाव जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन ( Jeep Car Accident ) अपघात झाला. या तिघांचा जागीच मृत्यू झाला ( Three Died in Accident at Parbhani ) असून सहा ते सात जण जखमी असून जखमींना पालमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Dec 26, 2021, 5:20 PM IST

परभणी - जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या पेठशिवणी परिसरात रविवारी (दि.26) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला ( Three Died in Accident at Parbhani ) असून एक जण गंभीर जखमी आहे. कारमधील सर्वजण पुण्यातील रहिवासी असून गंभीर जखमीला उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

अपघात होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनातून जखमींना तत्काळ बाहेर काढून पालमच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. तर रुग्णवाहिकेला बोलावून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील बाजूचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. जीपची पुढची काच फुटून नुकसान झाल्याचे दिसून येते.

या अपघातात जीपमधील पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर पालम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील एका गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह पालम येथील रुग्णालयात हलविले आहेत. या अपघातातील मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा - Trolley Accident : ऊसाची ट्रॉली घरावर उलटल्याने आजीसह नातीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.