ETV Bharat / state

वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला तलाठी

कोण आहे रे तुम्ही म्हणत खंडू पुजारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. सुरक्षारक्षकाने धाव घेत तलाठ्याला पकडले. सुरक्षारक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांची ओळख सांगताच तलाठी पळून जावू लागला.

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आणि तलाठी
author img

By

Published : May 27, 2019, 6:39 PM IST

परभणी - अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी जात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर तलाठी धावून गेल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिसांनी तलाठ्याला अटक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय , परभणी

परभणी जिल्ह्यातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रविवारी रात्री ते जात होते. मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास मोटारसायकलवर (एमएच २२ एआर २२०७) तलाठी खंडू बाबुराव पुजारी (राहणार रिधोरा, तालुका वसमत) हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारच्या पाठीमागे येत होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून सदरील व्यक्तीची चौकशी करण्यास सुरक्षारक्षकास सांगितले.

या कारवाईवेळी जिल्हाधिकारीही वाहनातून खाली उतरले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने बॅटरीचा प्रकाश मारला असता, कोण आहे रे तुम्ही म्हणत खंडू पुजारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. सुरक्षारक्षकाने धाव घेत तलाठ्याला पकडले. सुरक्षारक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांची ओळख सांगताच तलाठी पळून जावू लागला. सुरक्षारक्षकाने त्याला पकडून पूर्णा पोलीस ठाण्यात आणले. याबाबत वाहन चालक नंदकिशोर शेलाटे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पूर्णा पोलिसांनी तलाठ्याला आज (सोमवार) दुपारी अटक केली आहे.

Intro:परभणी - अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर एक तलाठी धावून गेल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या कानडखेड शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात वाळू माफियांवर कारवाईसाठी जात होते, त्यावेळी वसमत तालुक्यातील रिधोरा सज्जच्या तलाठयाने हा प्रकार केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दुपारी 'त्या' तालाठ्याला अटक केली आहे.Body:परभणी जिल्ह्यातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. या अनुषंगाने पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रविवारी रात्री ते जात होते. मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास (एम.एच. 22 ए.आर. 2207) या मोटारसायकलवर खंडू बाबुराव पुजारी (तलाठी, रिधोरा, ता. वसमत) हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारच्या पाठीमागे येत होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून सदरील व्यक्तीची चौकशी करण्यास सोबतच्या सुरक्षा रक्षकास सांगितले. तेव्हा जिल्हाधिकारी देखील वाहनातून खाली उतरले. यावेळी सुरक्षा रक्षकाने सदरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश मारला असता, कोण आहे रे तुम्ही म्हणून खंडू पुजारी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला, त्याच वेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने धाव घेत, त्याला पकडले व साहेब परभणीचे जिल्हाधिकारी आहेत, मी बॉडीगार्ड आहे, व सोबत इतर कर्मचारी असे सांगितले. त्यानंतर सदरील इसम पळून जात असताना सुरक्षा रक्षकाने त्यास पकडून पूर्णा पोलीस ठाण्यात आणले. याबाबत वाहन चालक नंदकिशोर शेलाटे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी याने दारू पिल्याचे वाटत होते, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तालाठ्याला अटक देखील करण्यात आली आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत फोटो :-तलाठी खंडू पुजारी, जिल्हधिकारी पी. शिवाशंकर & Vis :- कलेक्टर ऑफिस.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.