ETV Bharat / state

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम, परभणीत एक लिटरही संकलन नाही - आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात पुकारलेल्या एकदिवसीय दूध संकलन बंद आंदोलनात आज (मंगळवारी) परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, चेअरमन, संचालकांनी कडकडीत बंद पाळून सहभाग घेतला. दुधाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

agitation effect on milk collection  milk collection in parbhani  swabhimani agitation news  milk ban agitation parbhani  दूध संकलन बंद आंदोलन  आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम  स्वाभिमानी दूध बंद आंदोलन
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम
author img

By

Published : Jul 21, 2020, 3:02 PM IST

परभणी - दुधाला अनुदान देण्यात यावे व केंद्र शासनाने आयात केलेले दूध पावडर रद्द करावे, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आज दुपारी शासकीय दूध डेअरी येथे दूध बंद आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर दूध टाकण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय दूध डेअरी व खासगी संघात दररोज 40 हजार लिटर दुधाचे संकलन होते. मात्र, आंदोलनामुळे एक लिटरही दुधाचे संकलन झाले नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात पुकारलेल्या एकदिवसीय दूध संकलन बंद आंदोलनात आज (मंगळवारी) परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, चेअरमन, संचालकांनी कडकडीत बंद पाळून सहभाग घेतला. दुधाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा दूध संकलनावर परिणाम, परभणीत एकही लिटर संकलन नाही

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात आंदोलनाची हाक दिली होती. दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्यानुसार आज जिल्ह्यात सकाळपासून दूध संकलन बंद ठेवून सरकारचा निषेध केला आहे. आक्रमक बनलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेपासूनच राज्यभरात आंदोलन केले. हे आंदोलन परभणीतील शासकीय दुध डेअरी येथे करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी व अध्यक्षांनी या आंदोलनास पाठींबा देत आज संकलन कडकडीत बंद ठेवण्यात आले. परभणी डेअरीत एक लिटर सुद्धा दुधाचे संकलन झाले नाही. तसेच जिल्ह्यात खासगी संघ व सरकारी, असे 30 ते 40 हजार लिटरचे संकलन आहे. ते देखील बंद ठेवण्यात आले. या आंदोलनात किशोर ढगे, भास्कर खटिंग, संतोष पोते, रामप्रसाद गमे, ज्ञानेशवर भालेराव, हनुमान भरोशे, पप्पू कत्ते, निलेश साबळे, पांडुरंग काळे, एकनाथ भालेराव, आदींसह दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.