परभणी - निवडणूक प्रक्रियेत संवेदनशील केंद्रांचे व्यवस्थापन हे सर्वात मोठे आव्हान निवडणूक निर्णय अधिकाऱयांसमोर असते. परभणी जिल्ह्यातील अशाच ६४ संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून यापैकी ४ केंद्रांची ऑनलाईन पाहणी केली जाणार आहे.
परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरु केली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्राचा यापूर्वीच्या परिस्थितीचा अभ्यास करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने संवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे. एकूण ६४ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद प्रशाला सावंगी भांबळे खोली क्रमांक १, जिल्हा परिषद प्रशाला चारठाणा खोली क्रमांक १, जि.प. उर्दू कन्या शाळा मेवाती मोहल्ला जिंतूर, जि.प.प्रा.शा. चिकलठाणा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला वालूर, जि.प. हायस्कूल बोरी, जि.प. प्रा.शा. आसेगाव, जि.प. प्रा.शा. दुधगाव, जि. प.प्रशाला कौसडी, जि.प.प्रा.शा. न्यू राजमोहल्ला, डॉ. झाकीर हुसेन, प्रा.शाळा, राजमोहल्ला सेलू, मन्युसिपल कौन्सिल, शादीखाना सेलू, शासकीय मुलींचे वसतीगृह सेलू, न्यू हायस्कूल सेलू, गोमतीबाई बालवाडी सेलू, जि.प.प्रा.शा. ढेंगळी पिंपळगाव या केंद्रांचा समावेश आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात जि.प.प्रा.शा. मांडवा, जि.प.हायस्कूल झरी, जि.प.प्रा.शा. सावंगी खु. जि.प.प्रा.शा. टाकळी कुंभकर्ण, डॉ.झाकेर हुसेन माध्यमिक महाविद्यालय, श्रीरामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक, जि.प.पूर्व माध्यमिक शाळा शनिवार बाजार, नगर परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा, वसंतराव नाईक हायस्कूल कारेगावरोड, इंदिरा गांधी गर्ल्स उर्दू हायस्कूल शाही मशिदजवळ, कामगार कल्याण केंद्र काद्राबाद प्लॉट, भैय्यासाहेब आंबेडकर हॉल गौतमनगर, आंबेडकर वाचनालय राहुलनगर, पशुधन विकास अधिकारी कुकुटपालन प्रकल्प गंगाखेड रोड, महात्मा फुले विद्यालय भीमनगर, मॉडेल उर्दू हायस्कूल गालीबनगर, जि.प.प्रा.शा. असोला, जि.प.प्रा.शा. बाभळी, जि.प.कन्या शाळा पिंगळी या केंद्रांचा समावेश आहे.
गंगाखेड मतदारसंघात जि.प.कन्या शाळा ताडकळस, जि.प.प्रा.शा. दुसलगाव, जि.प.प्रा.शा. महातपुरी, जि.प.प्रा.शा. मरगळवाडी, जि.प.प्रा.शा. पूर्णा, जि.प.प्रा.शा. आंबेडकरनगर पूर्णा, जि.प.प्रा.शा. धनगरटाकळी, जि.प.प्रा.शा. उखळी खु, जि.प.प्रा.शा. चुडावा, जि.प.प्रा.शा. धारासूर या केंद्रांचा समावेश आहे.
पाथरी मतदारसंघात जि.प. प्रा.शाळा. देवनांद्रा साखर कारखाना वसाहत, जि.प.प्रा.शा. भोसा, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पेडगाव, जि.प.प्रा.शाळा शेळगाव, जि.प.प्रा. शा. धामोनी, परतूर मतदारसंघात जि.प.प्रा.शा. तळणी दक्षिण बाजू, जि.प.प्रा.शा. तळणी उत्तर बाजू, जि.प.प्रा.शा. अंबोडा, जि.प.प्रा.शा. केंधळी, जि.प.प्रा.शा. पिंपळवाडी, जि.प.प्रा.शा. सोनदेव, जि.प.प्रा.शा. केंधळी. घनसावंगी मतदारसंघात चिटली पुटली, महाकळा (३), तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव या मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच वरील पैकी ४ संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदानाची संपूर्ण प्रक्रिया वेबकास्टिंगच्या सहाय्याने ऑनलाईन केली जाणार आहे. शिवाय या केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी दिली आहे.