ETV Bharat / state

परभणीतील तरुणाचा प्लास्टिक बंदीसाठी साडेसहा हजार किलोमीटर अंतराचा दुचाकी प्रवास - परभणीतील तरुणाचा प्लास्टिक बंदीसाठी साडेसहा हजार किमीचा दुचाकी प्रवास

शहरातील एका तरुणाने  ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’ साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’ चा संदेश देत प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती केली आहे

परभणीतील तरुणाचा प्लास्टिक बंदीसाठी साडेसहा हजार किमीचा दुचाकी प्रवास
author img

By

Published : Nov 15, 2019, 6:39 AM IST

परभणी - शहरातील एका तरुणाने ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’ साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’ चा संदेश देत प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती केली आहे. यासाठी त्याने नुकताच नेपाळ, भुतान या दोन देशासह भारतीतील नऊ राज्यात दुचाकीवरून साडेसहा हजार किलोमिटरचा प्रवास केला आहे. त्यांचे नाव शैलेश शेषराव कुलकर्णी असे आहे.

परभणीतील तरुणाचा प्लास्टिक बंदीसाठी साडेसहा हजार किमीचा दुचाकी प्रवास

शैलेश यांची रायडींग हे पॅशन आहे. या आवडीतूनच त्यांनी आपल्या मोटारसायकवर देशभर विविध कारणाने भ्रमंती केली आहे. आपल्या छंदाला त्यांनी समाजहिताची जोड दिली आणि शासनाने 2 ऑक्टोबर रोजी घातलेल्या सिंगल युज प्लास्टीवर बंदीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशासह विदेशात जाऊन जनजागृती केली.

2 देश, 9 राज्य आणि 6 हजार 500 किमीचा प्रवास
शैलेश यांनी ३० ऑक्टोबर रोजी या प्रवासाला सुरवात केली. तब्बल १४ दिवसानंतर ते मंगळवारी सायंकाळी नागपुर मार्गे शहरात परतले. या दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रतील अनेक जिल्हे, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरीसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आदी जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. प्लास्टीकच्या वापराचे दुष्परिणाम सांगीतले आणि स्वच्छतेची शपथ दिली. त्याच बरोबर त्यांनी नेपाळ देशातील तीन जिल्हे आणि भुतान देशातील दोन जिल्ह्यांना देखील भेटी देऊन तेथही स्वच्छतेची शपथ दिली.

दरम्यान, भारत व बांगलादेशा दरम्यान असलेल्या सिमेवर वाघा सिमेवर सैनिकांसोबत प्लास्टीक बंदीबाबत चर्चा केली. त्याच बरोबर बांग्लादेशाच्या सैनिकांबरोबर देखील प्लास्टीक बंदीचा उहापोह केला. या १४ दिवसाच्या प्रवासात ते अनेक व्यक्तीं, समुहांशी जोडल्या गेले.

Intro:परभणी - येथील एक अवलिया, उच्चशिक्षीत असा तरुण ज्याचे नाव शैलेश शेषराव कुलकर्णी असे असून जो नुकताच नेपाळ, भुतान या दोन देशासह भारतीतील नऊ राज्यात दुचाकीवरून साडेसहा हजार किलोमिटरचा प्रवास करून स्वगृही परतला आहे. या प्रवासादरम्यान त्याने ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’ साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’ चा संदेश देत प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती केली.Body:परभणीतील या अवलियाची रायडींग ही पॅशन आहे. या आवडीतूनच त्यांनी आपल्या बुलेट मोटारसायकवर देशभर विविध कारणाने भ्रमंती केली आहे. सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक एस.एम. कुलकर्णी यांचे चिरंजीव व अभियंते असलेले शैलेश कुलकर्णी यांना दुचाकीवर फिरण्याची मोठी हौस. या छंदाला त्यांनी समाजहिताची जोड दिली. शासनाने दोन ऑक्टोबर रोजी घातलेल्या सिंगल युज प्लास्टीवर बंदीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशासह विदेशात जाऊन जनजागृती केली आहे.

2 देश, 9 राज्य आणि 6 हजार 500 किमीचा प्रवास

लायन्स क्लबचे सदस्य असलेल्या शैलेश यांनी ३० ऑक्टोबर रोजी या प्रवासाला सुरवात केली. तब्बल १४ दिवसानंतर ते मंगळवारी सायंकाळी नागपुर मार्गे शहरात परतले. या दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रतील अनेक जिल्हे, तेलंगान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरीसा, धत्तीसगड, पश्चिम बंगाल आदीं जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयाने भेटी दिल्या. प्लास्टीच्या वापराचे दुष्परिणाम सांगीतले. स्वच्छतेची शपथ दिली. त्याच बरोबर त्यांनी नेपाळ देशातील तीन जिल्हे व भुतान देशातील दोन जिल्ह्यांना देखील भेटी देऊन तेथही स्वच्छतेची शपथ दिली.
दरम्यान, भारत व बांगलादेशा दरम्यान असलेल्या सिमेवर वाघा सिमेवर ज्या पध्दतीने रिट्रीट होते, त्याचप्रमाणे संचलन सुरु झाले असता, तेथील सैनिकांमध्ये ते मिसळले. त्यांच्याशी प्लास्टीक बंदीबाबत चर्चा केली. त्याच बरोबर बांग्लादेशाच्या सैनिकांबरोबर देखील प्लास्टीक बंदीचा उहापोह केला. त्यांना देखील पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली. या १४ दिवसाच्या प्रवासात ते अनेक व्यक्तीं, समुहांशी जोडल्या गेले. ठिकठिकाणी लायन्स क्लबच्या सदस्यांसह शाळा, महाविद्यालयांनी देखील त्यांचे स्वागत केला तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे देखील आश्वासने दिली.

नुसतं फिरण्यापेक्षा समाजहित करावे - शैलेश कुलकर्णी
'मोटार सायकल रायडींग माझी पॅशन आहे. त्या निमित्ताने नुसते फिरण्यापेक्षा समाजाहितासाठी काही तरी करावे, समाजाला एखादा चांगला संदेश द्यावा, यासाठी हा प्रवास केला. या दरम्यान अतिशय चांगले व परिणामकारण अनुभव आले. त्यासाठी आई-वडीलांसह सासु-सासरे, पत्नी अपर्णा यांचे देखील मोठे पाठबळ मिळाल्याचे सांगितले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & byte_shailesh_kulkarniConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.