ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात भाजपकडून परभणीत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

author img

By

Published : Jul 10, 2020, 5:02 PM IST

शुक्रवारी जिंतूर रोडवरील महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर भाजपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी हे वाढीव वीजबिल माफ न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला आहे.

parbhani bjp agitation against mseb due to hike in light bill
परभणीत वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून महाविरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

परभणी - 'लॉकडाऊन' च्या काळात नागरिकांना बजावलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. आज (शुक्रवार) जिंतूर रोडवरील महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हे वाढीव वीजबिल माफ न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर मिटर रिडिंग न घेता विज वितरण कंपनीने हजारों ग्राहकांना एप्रिल ते जून या 3 महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वाच्यासव्वा रक्कमेची वीज बिले पाठवल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊनला सुरूवात झाली. सुमारे तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर सुध्दा पडता आले नाही.

हेही वाचा - खळबळजनक..! जादूटोण्याच्या संशयातून अमरावतीच्या सांभोऱ्यात बाप-लेकाची हत्या

शहरातील सर्व व्यवहार बंद होते, असे असतानाही वीज वितरण कंपनीने एप्रिल ते जून या तीन महिन्याचे कुठलेही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांच्या बिलाचा भुर्दंड जनतेच्या माथी मारल्याचा आरोप भरोसे यांनी यावेेळी माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे तातडीने वीज बिल माफ करावे, अशी मागणी करत पदाधिकारी व कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाचे कामकाज काही वेळासाठी ठप्प केले होते. तसेच या प्रश्नी जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना अवाच्यासव्वा दिलेली वीज बिले दुरुस्त करून न दिल्यास, यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देणारे एक निवेदन देखील दिले.

ज्यामध्ये परभणी तालुक्यातील झरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत गावठाण चे काम पूर्ण झाले असून गुत्तेदारांनी पूर्ण बिल पण उचलेले आहे. पण आज रोजी पर्यंत शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंगल फेजचे कनेक्शन देण्यात आले नाही. हा मुद्दा मांडला. तसेच तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथाळा, जोडपरळी या गावात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील वीज खांबे, तारे पडली आहेत. आज रोजीपर्यंत या गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले तारे, वीज खांबांचे कामे करण्यात आले नाहीत.

हेही वाचा - परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 'बालहट्ट' नाही हे दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे फार्स - तावडे

बोबडे टाकळी येथील ब्रेकर नादुरुस्त असल्यामुळे सबस्टेशन बरोबर चालत नाही. या भागातील जवळपास 15 गावे एकाच फिडरवर जोडल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत नाही. मागील एका महिन्यापासून ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नाही. राज्य सरकार मधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नंतर १०० युनिटपर्यंत माफी देण्यात येईल असेही सांगितले होते. परंतू घोषणेची अंमलबजावणी न करता उलट हजारो रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे, असाही आरोप करण्यात आला. या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय शेळके, नगरसेवक मधूकर गव्हाणे, सुनील देशमुख, सूनिल कुलकर्णी, भिमराव वायवळ, अतिक पटेल, दिनेश नरवाडकर, प्रदिप तांदळे, भालचंद्र गोरे, रितेश जैन, विजय दराडे, सुनील कांबळे, संतोष जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.