ETV Bharat / state

परभणी: बर्ड फ्लू प्रभावीत परिसर 90 दिवसांपर्यंत राहणार प्रतिबंधित - परभणी बर्ड फ्लू लेटेस्ट न्यूज

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य, पशुसंवर्धन आणि जिल्हा प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून हा संसर्ग आटोक्यात आणला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य पथकाने परभणी जिल्ह्याला भेट देऊन पाहाणी केली.

बर्ड फ्लू प्रभावीत परिसर 90 दिवसांपर्यंत राहणार प्रतिबंधित

author img

By

Published : Jan 19, 2021, 11:04 PM IST

परभणी - राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य, पशुसंवर्धन आणि जिल्हा प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून हा संसर्ग आटोक्यात आणला आहे. दरम्यान, भारतात हा संसर्ग अजून मानवापर्यंत पोहोचलेला नाही. परंतु तो मानवापर्यंत पोहोचल्यास ५० टक्क्यांपर्यंत मृत्यूदर होऊ शकतो. त्यामुळे ज्या भागात 'बर्ड फ्लू'चा संसर्ग आढळून आला, तो परिसर ९० दिवसांपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा अशी सूचना मंगळवारी परभणीत आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला केली आहे. तर केंद्रीय आरोग्य पथकाच्या सूचनेनुसार काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

'बर्डफ्लू'च्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्यात दिल्ली येथील केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी आले आहे. या पथकाने बर्ड फ्लू बाधित कोंबड्यांचा परिसर असलेल्या मुरुंबा, कुपटा आणि पेडगाव या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर संबंधित यंत्रणेची बैठक घेत त्यांना काही सूचना केल्या आहेत. या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भाततील माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, केंद्रीय आरोग्य पथकातील सदस्य तथा सार्वजनिक आरोग्य सेवा सल्लागार समितीचे डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अशोक लोणे यांची उपस्थिती होती.

बर्ड फ्लूच्या अनुषंगाने केलेल्या सर्व तपासण्या निगेटिव्ह

सदर पथकाने परभणीतील बर्ड फ्लू ग्रस्त मुरुंबा, कुपटा आणि पेडगाव या परिसराला भेट देऊन परभणी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कलिंग प्रक्रियेची पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बर्ड फ्लू ग्रस्त कोंबड्या नष्ट करून तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्या तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या देखील तपासण्या करण्यात आल्या. त्याप्रमाणेच परभणी जिल्ह्यातील मटण, चिकन आणि अंडी व्यवसायिक तसेच पोल्ट्रीफार्म संबंधित काम करणाऱ्या लोकांच्या देखील बर्डफ्लूच्या अनुषंगाने तपासण्या तात्काळ करून घेण्यात आल्या. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी दिली.

एकूण 4 हजार 55 पक्षी नष्ट करण्यात आले

सर्वात प्रथम बर्ड फ्लू आढळून आलेल्या परभणी तालुक्यातील मुरुंबा या गावात 13 जानेवारीला सुमारे 3 हजार 348 पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे 16 जानेवारीला सेलू तालुक्यातील कुपटा येथील 704 तर पेडगाव येथील 3 पक्षी नष्ट करण्यात आले. आतापर्यंत एकूण 4 हजार 55 पक्षी नष्ट करण्यात आले असून, 294 कुकुट अंडी आणि 1 हजार 115 किलोग्राम एवढे कुकुट खाद्यान्न देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने नष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी यावेळी दिली. तर याचा मोबदला म्हणून पोल्ट्रीफार्म चालकांना प्रति पक्षामागे 90 रुपये आणि पिल्लांमागे 40 रुपये एवढे अनुदान दिल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

बर्ड फ्लूग्रस्त गावांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या सूचना

यावेळी केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासनाला ज्या सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये 'प्रभावित गावांमधील एक किलोमीटरचा परिसर 90 दिवसांपर्यंत सक्तीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवावा. तसेच 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व्ह करून आरोग्य तपासण्या करण्यात याव्यात' त्यानुसार जिल्हा प्रशासन याची अंमलबजावणी करत आहे. दरम्यान प्रभावित भागांमध्ये कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई केल्यानंतर अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही बर्ड फ्लू ग्रस्त कोंबडी, कावळा, बदक किंवा अन्य पक्षी आढळून आला नसल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

बर्ड फ्लू प्रभावीत परिसर 90 दिवसांपर्यंत राहणार प्रतिबंधित

उपाययोजनांमुळे बर्ड फ्लू आटोक्यात

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने आम्हाला परभणीत पाहणी करण्यासाठी पाठवले होते. मात्र, या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना झाल्याच्या दिसून आल्या. परिणामी बर्ड फ्लू आटोक्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य सेवा समितीचे सल्लागार डॉ.सुनील खापरडे यांनी सांगितले. तसेच बर्ड फ्लू मानवामध्ये आल्यास तो अत्यंत धोकादायक ठरतो. 100 लोकांना याचा संसर्ग झाल्यास त्यातील 50 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. परंतु भारतात अद्यापपर्यंत मानवाला हा संसर्ग झाल्याचे उदाहरण नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लूने प्रभावित झालेला परिसर प्रतिबंधित करावा, तसेच 10 किलोमीटरच्या परिसरात सर्वे करून आरोग्य तपासण्या आणि इतर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.