ETV Bharat / state

परभणीत यंदा कोणाकडे असेल मतदारांचा कौल ?

परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी, असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Oct 23, 2019, 5:25 PM IST

परभणी - परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी, असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.

शिवसेनेचे राहुल पाटील हे परभणीचे आमदार आहेत. पाथरी मतदार संघातून अपक्ष आमदार मोहन फड यांना भरघोस मते देऊन विधानसभेत पाठवलं होत. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट त्यांनी आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानपरिषदेवर बाबाजानी दुऱ्हानी हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. तर विपलव बाजोरीया हे आमदार आहेत. तर संजय जाधव हे शिवसेनचे खासदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीचं प्राबल्य आहे.

जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पाथरी, जिंतूर, पालम नगरपालिका राष्ट्रवादीच्या तर गंगाखेड काँग्रेसच्या ताब्यात आहे. सेलू, मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका भाजपच्या, तर पूर्णा, मानवत ह्या दोन नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 9 पैकी 5 पंचायत समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत तर 4 युतीच्या ताब्यात आहेत.

परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांची काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्याशी प्रमुख लढत होत आहे. तसेच प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे रविराज देशमुख आणि एमआयएमचे अली खान यांच्याकडे ही पाहिल्या जाते. याशिवाय याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहम्मद झैन हे देखील रिंगणात आहेत.

मागच्या वेळी (2014) परभणी विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एमआयएमचे सज्जू लाला यांच्यावर 27000 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे आनंद भरोसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी 40 हजारांहून अधिक मते मिळवली होती. मात्र यावेळी युती असल्याने भाजपच्या आनंद भरोसे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या सोबत आहेत.

परभणी विधानसभा मतदारसंघ निकाल 2014

  • डॉ. राहुल पाटील (शिवसेना) - 71 हजार 584
  • खालीद सय्यद (एमआयएम) 45 हजार 058
  • आनंदराव भरोसे (भाजप) - 42 हजार 051
  • प्रताप देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) - 11 हजार 375

पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढत
पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्याशी होत आहे.
मागच्यावेळी (2014) देखील या दोघांमध्येच काट्याची टक्कर होऊन अवघ्या दोन हजारांच्या फरकाने मोहन फड यांनी विजय मिळवला होता. यावेळी मात्र या दोघातच पुन्हा सामना रंगत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर आणि शिवसेनेचे बंडखोर डॉ. जगदीश शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांचा प्रभाव मोहन फड आणि सुरेश वरपूडकर या दोघांवरही पडणार असून नेमका त्याचा फटका कोणाला बसतो हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या ठिकाणी यावेळी देखील काट्याची टक्कर असल्याचे दिसून येते.

पाथरी विधानसभा मतदारसंघ निकाल

  • मोहन फड (अपक्ष) - 69 हजार 081
  • सुरेश वरपूडकर (काँग्रेस) - 55 हजार 632
  • अब्दुल्ला खान दुर्राणी (राष्ट्रवादी काँग्रेस) - 46 हजार 304
  • मीरा रेंगे (शिवसेना) - 35 हजार 408

जिंतूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख लढत

जिंतूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे विरुद्ध तत्कालीन कॉग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यात पारंपारिक लढत गेल्या अनेक वर्षांपासून होत आली आहे. यंदा मात्र आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध भाजपावासी झालेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या रिंगणात आहेत.
मागच्यावेळी (2014) रामप्रसाद बोर्डीकर यांना वीस हजाराहून अधिकच्या फरकाने विजय भांबळे यांनी पराभूत केले होते. यावेळी मात्र बोर्डीकर कुटुंबीय मागचा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरले आहे; परंतु याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे आणि शिवसेनेचे बंडखोर राम खराबे या उमेदवारांचा भांबळे आणि बोर्डीकर यांना समान फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणची लढत देखील काट्याची असल्याचे बोलले जाते.

जिंतूर विधानसभा मतदारसंघ निकाल 2014

  • विजय भांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 लाख 06 हजार 912
  • रामप्रसाद कदम बोर्डीकर (काँग्रेस) - 79 हजार 554
  • संजय साडेगावकर (भाजप) - 30 हजार 310
  • राम पाटील (शिवसेना) - 6 हजार 962

गंगाखेड विधानसभा प्रमुख लढत
गंगाखेड विधानसभा हा मतदार संघ पैसेवाल्या उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून गेल्या वीस वर्षांपासून प्रसिद्ध आहे. याठिकाणी विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याविरुद्ध मैदानात शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर याही प्रमुख दावेदार मानल्या जातात. दरम्यान, मधुसूदन केंद्रे यांच्या बद्दल गेल्या पाच वर्षात असलेल्या नाराजीमुळे ते यावेळी प्रमुख लढतीतून मागे पडले आहेत. तसेच माजी आमदार सिताराम घनदाट हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांचाही या वेळी फारसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विशाल कदम, रासप चे रत्नाकर गुट्टे आणि वंचित च्या करूणा कुंडगीर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

मागच्या वेळी (2014) गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे विरुद्ध आमदार मधुसूदन केंद्रे अशी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांनी केवळ दीड हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निकाल 2014

  • मधुसुदन केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस)- 58 हजार 415
  • रत्नाकर गुट्टे (RSPS) - 56 हजार 126
  • घनदाट मामा (अपक्ष) - 47 हजार 714
  • शिवाजी दळनर (शिवसेना) - 41 हजार 915

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.