ETV Bharat / state

दुर्दैवी! नऊ वर्षीय बालकाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू - गंगाखेड

कापूस घेऊन जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने श्रुतुराजला धडक दिली. धडकेत श्रुतुराज खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे टायर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त सायकल२२२
author img

By

Published : Apr 7, 2019, 12:42 PM IST

परभणी - गंगाखेड येथील दत्तमंदिर परिसरातील ईसाद रोडवर सुटीच्या दिवशी सायकल खेळत असताना घेणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलाचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. श्रुतुराज विष्णू जाधव असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

गंगाखेडच्या विठ्ठल नगरातील श्रुतुराज विष्णू जाधव हा आपल्या आई व बहिणीसह राहत होता. सुटी असल्याने तो सकाळीच घरासमोर सायकल खेळत होता. काही वेळ घरासमोर सायकल खेळत असताना दत्त मंदिर परिसरातील इसाद रोडवर आला. यावेळी कापूस घेऊन जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने श्रुतुराजला धडक दिली. धडकेत श्रुतुराज खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे टायर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड, जमादार वसंत निळे, बळीराम करवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रुतुराज याच्या वडिलांनी सुमारे दीड वर्षापूर्वी विषारी औषध पिवून आत्महत्या केली होती. तेंव्हापासून श्रुतुराज आई आणि लहान बहिणीसोबत राहत होता. गुढी पाडव्याच्या दिवशीच या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Intro:परभणी - गंगाखेड येथील दत्त मंदिर परिसरातील ईसाद रोडवर सुटीच्या दिवशी सायकल खेळण्याचा आनंद घेणाऱ्या एका नऊ वर्षीय बालकाचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून श्रुतुराज विष्णू जाधव असे या बालकाचे नाव आहे. Body:गंगाखेडच्या विठ्ठल नगरातील श्रुतुराज विष्णु जाधव हा आपल्या आई व बहिणीसह राहत होता. आज सुटी असल्याने तो सकाळीच घरासमोर सायकल खेळत होता. काही वेळ घरासमोर सायकल खेळत असताना तो दत्त मंदिर परिसरातील इसाद रोडवर आला. याच दरम्यान कापूस घेऊन जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने श्रुतुराजला धडक दिली. या धडकेत श्रुतुराज खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे टायर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सपोनि सुरेश थोरात, सपोनि राजेश राठोड, जमादार वसंत निळे, बळीराम करवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दिड वर्षात जाधव कुटुंबावर हा दुसरा आघात झाला आहे. श्रुतुराज याच्या वडिलांनी सुमारे दिड वर्षापूर्वी विषारी औषध पिवून आत्महत्या केली होती. तेंव्हापासून श्रुतुराज त्याच्या आई व लहान बहिणीसोबत राहत होता. गुढी पाडव्याच्या दिवशीच या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- घटनास्थळी असलेल्या सायकलचा फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.