ETV Bharat / state

'पदवीधर'साठी परभणीत मतदारांची नव्याने नोंदणी;  31 हजार मतदारांची यादी रद्द - उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे बातमी

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या संदर्भात 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी सूचना प्रसिध्द होणार आहे.

'पदवीधर' साठी परभणीत मतदारांची नव्याने नोंदणी
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:33 PM IST

परभणी - पदवीधरांच्या औरंगाबाद मतदारसंघासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोंबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार परभणी जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी केलेल्या तब्बल 31 हजार 624 मतदारांचे नाव रद्द करण्यात आले आहे. त्यांना देखील नव्याने नोंदणी करावी लागणार असून याशिवाय नवीन मतदारांना देखील नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

'पदवीधर' साठी परभणीत मतदारांची नव्याने नोंदणी

हेही वाचा- मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ल्याचा प्रयत्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गौप्यस्फोट

या संदर्भात परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या संदर्भात 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी सूचना प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर नोंदणी सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. तर 19 नोव्हेंबर पासून मतदार याद्यांची छपाई होणार आहे. तसेच 26 डिसेंबर रोजी पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली.

हेही वाचा-अनिल गोटे धुळे शहर विधानसभेसाठी शिवसेनेकडून लढणार?

दरम्यान, नवीन मतदारांना पदवी किंवा पदव्युत्तर झाल्याचे संबंधित विद्यापीठाचे प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका आणि आधारकार्ड देऊन नवीन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. जुन्या मतदारांना देखील ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यांना सुद्धा पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका देऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. यावेळी 40 हजार अर्ज छपाई करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील 40 हजार मतदारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही लोखंडे म्हणाले.

दरम्यान, राजकीय व्यक्तींना मतदारांची नोंदणी करता येणार नाही. कारण या पूर्वीच्या अनुभवावरुन अनेक बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जुनी मतदारांची यादी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन मतदारांना थेट तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. याशिवाय कुठल्याही संस्थेच्या प्राचार्य, शिक्षकांना एकत्रित मतदारांची नोंदणी करुन त्यावर स्वतःचे स्वसाक्षांकन करुन ते अर्ज जमा करता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Intro:परभणी - पदवीधरांच्या औरंगाबाद मतदार संघासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोंबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार परभणी जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी केलेल्या तब्बल 31 हजार 624 मतदारांचे नाव रद्द करण्यात आले आहे. त्यांना देखील नव्याने नोंदणी करावी लागणार असून याशिवाय नवीन मतदारांना देखील नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.Body:या संदर्भात परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या संदर्भात 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी सूचना प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर नोंदणी सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. तर 19 नोव्हेंबर पासून मतदार याद्यांची छपाई होणार आहे. तसेच 26 डिसेंबर रोजी पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात येणार असून, 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली.
दरम्यान नवीन मतदारांना पदवी किंवा पदव्युत्तर झाल्याचे संबंधित विद्यापीठाचे प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका आणि आधार कार्ड देऊन नवीन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. जुन्या मतदारांना देखील ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, त्यांना सुद्धा पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका देऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. यावेळी 40 हजार अर्ज छपाई करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील 40 हजार मतदारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही लोखंडे म्हणाले.
दरम्यान, राजकीय व्यक्तींना मतदारांची नोंदणी करता येणार नाही. कारण या पूर्वीच्या अनुभवावरून अनेक बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जुनी मतदारांची यादी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन मतदारांना थेट तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. याशिवाय कुठल्याही संस्थेच्या प्राचार्य, शिक्षकांना एकत्रित मतदारांची नोंदणी करून त्यावर स्वतःचे स्वसाक्षांकन करून ते अर्ज जमा करता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_byte_arvind_lokhande_dy_collecter(election)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.