परभणी - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे गेल्या आठ महिन्यांपासून विविध कार्यावर, इव्हेंटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या निषेधार्थ परभणीत जिल्हा मंडप डिलर्स असोसिएशनने आज (सोमवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी घोषणाबाजी करतपूर्ण क्षमतेने मंगल कार्यालये तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
..तर मंत्र्यांच्या कार्यक्रमांना एकही खुर्ची देणार नाही'; परभणीत मंडप डिलर्सचे धरणे आंदोलन - mandap And decoration dealers
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून कार्यक्रम, इव्हेंटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंडप व्यावसायिक अडचणीत आले आहेत. आता या व्यावसायिकांना त्यांचे व्यावसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करत मंडप मंडप डिलर्स असोसिएशनने आज (सोमवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू केले.